Ambernath Doctor Try To End Life Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News: महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, रात्री झोपण्यापूर्वी घेतल्या झोपेच्या गोळ्या अन्...; धक्कादायक कारण समोर

Ambernath Doctor Try To End Life: अंबरनाथमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. एका ६ वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला या डॉक्टरला जबाबदार धरले जात आहे.

Priya More

Summary -

  • अंबरनाथमध्ये महिला डॉक्टरने केला आत्महत्येचा प्रयत्न

  • ६ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर निर्माण झाला वाद

  • सामाजिक कार्यकर्त्यांकडून मानसिक त्रास झाल्याचा डॉक्टरांचा आरोप

  • डॉक्टरने झोपेच्या गोळ्या घेत केला आत्महत्येचा प्रयत्न

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये एका ६ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र डॉक्टरने केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या मुलाला सर्दी खोकला झाल्याने त्याच्यावर डॉक्टर स्वप्नाली गायकर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांच्या तिसऱ्या दिवशी सलाईन लावून घरी गेल्यावर त्याला त्रास सुरू झाला आणि तिथून दुसऱ्या खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप पालकांनी केला होता. तसंच पीएम रिपोर्टमध्ये कुणाची चूक आहे ते पाहून स्वप्नाली गायकर यांची चूक असल्यास कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली होती.

मात्र यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी, संदीप भरड, वैशाली नलावडे आणि मिलिंद मगर या चौघांनी मृत मुलाच्या पालकांची कोणतीही तक्रार नसताना आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी केला. याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. गायकर यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी वेळीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या चौघांनी कायदेशीर मार्गाने दाद मागावी, त्यात सत्य समोर येईलच, पण विनाकारण माझी बदनामी करू नये, असं डॉक्टर स्वप्नाली गायकर म्हणाल्या. तर प्रवीण गोसावी, संदीप भरड, वैशाली नलावडे आणि मिलिंद मगर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत हा डॉक्टर गायकर यांचा ड्रामा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. सध्या या प्रकरणाची अंबरनाथमध्ये चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Velvet Blouse Design: वेलवेटच्या ब्लाऊजचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Fire : केमिकल फॅक्ट्रीमध्ये धडाधड स्फोट, अग्नितांडवात ८ जणांचा जिवंत जळून मृत्यू

Singer Death: लोकप्रिय गायिका काळाच्या पडद्याआड; कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत खालावली, संगीत विश्वावर शोककळा

Solar Eclipse Tips: सूर्यग्रहणावेळी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? पालकांसाठी 7 महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT