Heart Attack Claims Life of Woman In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: राम नवमीची मिरवणूक पाहायला गेलेल्या महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू

Heart Attack Claims Life of Woman In Pune: पुण्यामध्ये राम नवमीची मिरवणूक पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील ससाणेनगरमध्ये गुरूवारी संध्याकाळी ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • पुण्यात राम नवमी मिरवणुकीदरम्यान महिलेचा मृत्यू

  • हृदयविकाराच्या झटक्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू

  • डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

  • पुण्यातील ससाणेनगर येथे घटना

सचिन जाधव, पुणे

रामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा पुण्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूक पाहायला ही महिला गेली होती. रंजना रवींद्र जाधव (वय ६५ वर्षे ) असं या महिलेचे नाव आहे. ही महिला सणाणेनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होती. डीजेच्या आवाजामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

ससाणेनगर येथे राम नवमीनिमित्त गुरूवारी मिरवणूक काढण्यात आली होती. डीजेच्या तालावर ही मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी रंजना जाधव गेल्या होत्या. मिरवणूक पाहताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पातळी ओलांडून सुरू असलेल्या डीजेच्या अति आवाजामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप मृत महिला रंजना जाधव यांच्या मुलाने केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ससाणेनगर येथील मुख्य रस्त्यावर गुरूवारी ६ मंडळांनी एकत्र येत राम जन्मोत्सव सोहळा मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी ध्वनीवर्धक म्हणून डीजेचा वापर करण्यात आला होता. ही मिरवणूक पाहण्यासाठी घरातील काही कामे उरकून रंजना जाधव गेल्या होत्या. तिथे गेले असता त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्या खाली पडल्या. डीजेच्या आवाजामुळे त्यांच्या आवाजाकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. त्या खाली पडल्याचे काही महिलांनी पाहिले त्यांनी रंजना यांना तातडीने रिक्षात बसविले.

पण रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने ऑटो रिक्षा रूग्णालयात जाण्यासाठी खूप वेळ गेला. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि मृत घोषीत केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रंजना जाधव या लष्कराच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमधून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ATM आणि UPIद्वारे काढता येणार PF; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Gond Katira Benefits In Summer: गोंद कतीरा म्हणजे काय? उन्हाळ्यात का खातात?

Maharashtra Live News Update: हमीभावासाठी बच्चू कडूंचा एल्गार; ९ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा

Devendra Fadnavis: लॉकडाऊनची अफवा पसरवाल तर खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Sara Arjun: 'धुरंधर २'नंतर सारा अर्जुनला मिळाला मोठा चित्रपट; आता या अभिनेत्यासोबत करणार ऑनस्क्रीन रोमांस

SCROLL FOR NEXT