Raj Thackeray News : मनसैनिकांकडून राम नवमी धडाक्यात; मात्र राज ठाकरे परदेशात, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

Raj Thackeray Latest News : राज ठाकरे परदेशात असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
Raj Thackeray News
Raj Thackeray News SAAM TV
Published On

Raj Thackeray News : उद्या देशभरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मनसेकडून देखील राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करा, असे आदेश अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पाडवा मेळाव्यात दिले. मात्र ते स्वतः परदेशात असल्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात जोरादर भाषण देत मशिदी भोंग्यावरून सरकारला प्रश्न केले होते. त्याचबरोबर राज ठाकरेंनी राम नवमी साजरी करण्याचा आदेश दिला. मात्र, राज ठाकरे स्वतः मात्र यामध्ये सहभागी होणार नाहीत.

कारण, राज ठाकरे सहकुटुंब परदेशात आहेत. त्यामुळे आता राम नवमी कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे का ? लोकां सांगे ब्रम्हज्ञान आपले मात्र कोरडे पाषाण, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

Raj Thackeray News
MNS MLA Raju Patil : औरंगाबादचं छ. संभाजीनगर होतं तर गुजरातमधील अहमदाबाद ...'; राजू पाटीलांनी केली भाजपला नाव बदलण्याची मागणी

राज ठाकरे मुंबईत नाहीत. पण आम्ही अनेक कार्यक्रम घेत असल्याचे मनसेचे नेते म्हणत असले तरी मात्र यावरून आता विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतल आहे.

हिंदूचा मुद्दा आक्रमकपणे मांडणारे राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. केवळ राम नवमीच नाही तर हनुमान जयंतीला देखील ते कार्यक्रमात दिसणार नाहीत. एकंदरीत, राजाच नसल्याने प्रजा बिनघोर असल्याची स्थिती सध्या मनसे पक्षात पाहायला मिळत आहेत.

Raj Thackeray News
Nashik Lady Doctor: नाशकात गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण; कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढी पाडवा मेळ्यात जोरदार भाषण दिलं. तसेच हिंदू बांधवांना जोरदारपणे रामनवमी साजरा करण्याची विनंती केली. राज ठाकरे म्हणाले होते, 'माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो की, येणारी रामनवमी जोरदार साजरी करा'.

त्याचबरोबर ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वत: रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या...', असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com