अभिजीत देशमुख
Dombivli News : राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याच नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर राजकारण पेटलं आहे. एमआयएम पक्षाने या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नापंसती दर्शवली आहे. याचदरम्यान, औरंगाबादचा नाव छत्रपती संभाजीनगर होतं, तर गुजरातमधील अहमदाबादचे नाव अहमदाबाद का?असा खोचक सवाल मनसेकडून भाजपला करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
राजू पाटील म्हणाले की, 'माझी पहिली मागणी आहे की, अहमदाबादचे नाव बदललं पाहिजे. औरंगाबादचा नाव छत्रपती संभाजीनगर होतं, तर गुजरातमधील अहमदाबादचे नाव अहमदाबाद का? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी भाजपला (BJP) केला. गुजरातमधील तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातल्याबाबत केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आमदार पाटील यांनी ही मागणी केली.
अहमदाबाद मधील चांडोला तलावावरील अतिक्रमणाबाबत गुजरातमधील तरुणाने राज ठाकरे यांना ट्विट करत मदतीचं आवाहन केलं होतं.
याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर महाराष्ट्रात काही गोष्टी घडतात. त्यामुळे गुजरातमधील या तरुणाने देखील राज ठाकरे यांना ट्विट करत साद घातली असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
तसेच गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलले पाहिजे, अशी आग्रही मागणी राजू पाटील प्रसारमाधम्यांशी बोलताना भाजपला केली. मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीनंतर भाजप नेत्यांकडून उत्तर दिले जाईल, आता पाहावे लागणार आहे. तसेच आगामी निवडणुकीत अहमदाबादचे नावासाठी बदलण्यासाठी मनसे आग्रही राहील का, हे देखील पाहावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.