Rohit Pawar News : रोहित पवारांकडून CM एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्याचं 'ऑपरेशन'; तानाजी सावंतांवरही साधला निशाणा

Rohit Pawar on CM Eknath Shinde: दवाखाना भाजपचा आहे त्यामुळे डॉक्टरला किती वेळ ठेवायचं, किती महत्व देतील हे देखील पाहावं लागेल
Rohit PAwar
Rohit PAwarSaam TV
Published On

सुशील थोरात

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डी लिट पदवीवरून निशाणा साधला आहे. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लिट पदवी देत असताना अभ्यास नक्कीच केला असेल, असा टोला लगावत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली पदवी त्यांच्या कार्यामुळे दिली असेल, त्याचा मान सन्मान आपण सर्वांनीच केला पाहिजे. मी याआधीच छोट मोठे ऑपरेशन केल्याने मी आधीच डॉक्टर झालो होतो, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होत.

Rohit PAwar
Vaibhav Kadam News: 'एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली...' जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचे जीवन संपवण्याआधीचे 7 स्टेटस

यावर बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, ऑपरेशन केलं तर दीर्घकाळ पेशंटला मदत होते. मात्र चुकीचं ऑपरेशन केलं तर पेशंट अडचणीत येऊ शकतो, तर कदाचित डॉक्टरही अडचणीत सापडू शकतो. दवाखाना भाजपचा आहे त्यामुळे डॉक्टरला किती वेळ ठेवायचं, किती महत्व देतील हे देखील पाहावं लागेल, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तानाजी सावंत म्हणाले की शिवसेनेतील बंडाआधी दीडशेहून अधिक बैठका घेतल्या. तर त्यांची इतकी क्षमता आहे का? हे आपल्याला बघावं लागेल. तसेच सोलापूरमध्ये ते अनेक आमदार निवडून आणणार होते किती आमदार निवडून आणले याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

Rohit PAwar
Kolhapur News : अंबाबाईचं दर्शन घेतलं अन् मंदिरातून बाहेर पडताच भाविकाचा मृत्यू; नातेवाईकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पदरी दु:खच आलं

शिवसेना फुटत असताही शिवसेना पक्षाचा हा अंतर्गत विषय असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या सर्व घडामोडींच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं उघडपणे सांगितलं होतं. आता यात आता तिसरा कलाकार आलाय ते म्हणजे तानाजी सावंत. आता हे तीन कलाकार आणि आणखी किती कलाकार असतील हे सांगता येत नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com