Supreme Court On Maharashtra Government: महाराष्ट्र सरकार दुबळं आहे; द्वेषपूर्ण वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालय संतापले

Supreme Court: मुंबईतील हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान द्वेषपूर्ण वक्तव्यावर न्यायाधीश केएम जोसेफ यांनी मत व्यक्त केलं.
Maharashtra Government
Supreme CourtTwitter/ @ANI
Published On

New Delhi : मुंबईतील हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान द्वेषपूर्ण वक्तव्यावर न्यायाधीश केएम जोसेफ यांनी मत व्यक्त केलं. 'महाराष्ट्र सरकार दुबळं आहे. ते काहीच करत नाही. त्यामुळं हे सर्व काही होत आहे. ज्यावेळेला राजकारण आणि धर्म वेगळा होईल. तेव्हा हे सगळं संपुष्टात येईल. राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, असं मत न्यायाधीश केएम जोसेफ यांनी व्यक्त केलं.

न्यायालयाने (Supreme Court) सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या सॉलिटर जनरल तुषार मेहता यांना तुम्ही नाटक बंद करा. धार्मिक वक्तव्या संदर्भात तुम्ही काय करत आहात हे सांगा, अशा शब्दात राज्य सरकारला झापले. न्यायाधीश जोसेफ म्हणाले, तेढ निर्माण करणारी भाषा एक दुष्टचक्र आहे. यावर लोक प्रतिक्रिया देणारच, हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.

Maharashtra Government
Rohit Pawar News : रोहित पवारांकडून CM एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्याचं 'ऑपरेशन'; तानाजी सावंतांवरही साधला निशाणा

मुस्लीम समाजाविरोधात आपत्तीजनक विधानाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांच्या संघटनेला धार्मिक यात्रा/ मोर्चा काढण्याचा अधिकार असल्याचा युक्तीवाद केला. यावर न्यायालयाने पुन्हा एकदा कठोर शब्दात झापले.

तुम्हाला कायदा धार्मिक मोर्चा काढण्यास परवानगी देतो. मात्र, हाच द्वेषपूर्ण मोर्चा देशाचा कायदा तोडण्याची परवानगी देत नाही. या मोर्चामधून अल्पसंख्याक समुदायाला खाली पाहावं लागेल, अशी वक्तव्य केली जात आहे. त्यांना पाकिस्तानला जाण्यास सांगितलं जात आहे. मात्र, हे ते लोक आहे ज्यांनी भारताला आपला देश मानलं. ते तुमचे भाऊ बहिण आहेत. भाषणाचा स्तर खाली जाता कामा नये. विविधतेला स्वीकारणारी आपली संस्कृती आहे.

आपण कोणत्या दिशेने जात आहोत…?

न्यायमुर्ती नागरत्ना यांनी या सर्व विधानांवर चिंता व्यक्त करत आपण कोणत्या दिशेने जात आहोत, असा सवाल उपस्थित केला आहे. आपल्याकडे जवाहर लाल नेहरू, वाजपेयी सारखे नेते झाले. नेहरू यांचं मध्यरात्रीचं भाषण पाहा. आतातर सगळ्या पक्षातील लोकांकडून आपत्तीजनक वक्तव्य येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com