धक्कादायक! टायर फुटल्याने कार पानशेत धरणात ;महिलेचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! टायर फुटल्याने कार पानशेत धरणात ;महिलेचा मृत्यू (पहा व्हिडिओ)

तर पती आणि मुलगा वाचले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - अचानक टायर Tyre फुटल्याने रस्त्यावरुन जात असताना कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पानशेत धरणाच्या Panshet dam पाण्यात पडली. या भीषण अपघातात कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि मुलगा वाचले आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस Police निरीक्षक मनोज पवार Manoj Pawar यांनी या घटनेबाबाद माहिती दिली.

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार, समृद्धी योगेश देशपांडे असे या मृत महिलेचे नाव आहे. ही महिला पुण्यातील शनिवार पेठ परिसरात होती. या अपघातात पती योगेश देशपांडे आणि मुलगा हे बचावले आहेत. घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी घडली आहे.

प्रताप माहितीनुसार, हे तिघेजण पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. पुढे आल्यावर त्यांनी आपली कार जेवणासाठी एका हॉटेलवर थांबवली होती. धरणाच्या काठाने कार चाललेली असताना अचानक टायर फुटला आणि कार कारवरील नियंत्रण गमावलं त्यानंतर कार सरळ पाण्यात जाऊन पडली.

कार चालकाने यावेळी कार आवरण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न निष्फळ ठरले. ही कार सुरुवातीला पाण्यावर तरंगत होती. पण नंतर कार हळू हळू पाण्यात गेली. त्यामुळे पुढच्या बाजूच्या दोन्ही खिडक्या उघड्या असल्याने महिलेचे पती आणि मुलगा पाण्याबाहेर पडण्यास यशस्वी झाले. पण मागील दरवाजाची काच बंद असल्यामुळे समृद्धी यांना बाहेर पडता न आल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT