Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: धावत्या लोकलमध्ये महिलेची प्रसूती, दिला गोंडस मुलीला जन्म

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Delivery In Local Train Mumbai

उरण-नेरुळ रेल्वे (Uran Nerul Local) मार्गावर धावत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसूती (Woman Delivery In Local Train) झाल्याची घटना समोर आलीय. ही महिला उरण वरून नेरुळला मनपा रुग्णालयात बाळंतपणासाठी जात होती. मात्र, बामणडोंगरी रेल्वे स्थानक येताच या महिलेची प्रसूती झाली. या घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Marathi News)

झाकीय मोहम्मद सय्यद असं या महिलेचं नाव आहे. लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) डब्ब्यातच महिलेची प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. यावेळी शेजारील महिला डब्ब्यातून काही महिलांना मदतीसाठी बोलाविण्यात आलं होतं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाळ आणि आई सुखरूप

या घटनेची (mumbai local) माहिती मोटारमनने रेल्वे पोलिसांना दिली. माहिती मिळताच तात्काळ नेरुळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती. या महिलेला आणि नवजात बाळाला तात्काळ नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं (birth to girl child) आहे. माता व बालक या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

उरण परिसरातील रहिवासी झाकिया मेहबूब सय्यद ही महिला प्रसुतीसाठी नेरुळला मनपा रुग्णालयात जात होती. सकाळी ती उरण-नेरळ लोकल ट्रेनमध्ये असताना ट्रेन नेरूळ स्थानकावर येताच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. डब्ब्यातच तिची (Woman Delivery) प्रसुती देखील झाली, अशी माहिती शासकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटरे यांनी दिलीय.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्परतेने मदत केली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांचं कौतुक केलं जातंय. ही महिला आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळतेय.

त्यानंतर तीन महिला पोलीस कॉन्स्टेबलने तिला रुग्णवाहिकेद्वारे नेरुळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात नेण्यात मदत केली, असं देखील अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं (mumbai news) आहे. महिलेच्या पतीने तत्पर मदत केल्याबद्दल रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT