Wolfdog  Saam tv
मुंबई/पुणे

Wolfdog : लांडगा आणि कुत्र्याच्या संकरातून अस्तित्वात आली नवी प्रजाती, राज्यातील ३ जिल्ह्यात मोठा वावर

Wolfdog found in pune : वाढत्या शहरीकरणाचे परिणाम वन्यजीवांवर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील एका भागात लांडगा आणि कुत्र्याच्या संकरातून आस्तित्वात आलेली नवी प्रजाती समोर आली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : वाढत्या शहरीकरणाचे गंभीर दुष्पपरिणाम आता वन्यजीवांवर देखील होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. वन्यजीव शहरालगत असलेल्या भागात येऊ लागल्याने प्राण्यांची पुन्हा एकदा एक नवी प्रजाती विकसित झाली आहे. लांडगा आणि मानवी वस्तीत राहणाऱ्या भटक्या श्वानांपासून वूल्फ डॉग ही लांडग्यांची नवी प्रजाती अस्तित्वात आली आहे.

पुण्यातील द ग्रास लँड ट्रस्ट ही एनजीओ प्रामुख्याने मैदानी प्रदेशात वावरणाऱ्या वन्यजीवांच संशोधन आणि संवर्धनावर काम करते. पुणे शहरालगत असलेल्या पुरंदर भागामध्ये ही एनजीओ 2014 मध्ये काम करत आहे. त्यांना लांडग्याच्या एका कळपामध्ये भटक्या श्वान लांडग्या सारखा दिसणारा एक अज्ञात प्राणी आढळला. मात्र तो अज्ञात प्राणी जरी लांडग्यांच्या कळपामध्ये वावरत असला तरी.. त्या प्राण्याचे बहुतांश साधर्म्य हे लांडग्याच्या शरीराशी अगदी विसंगत दिसत होते.

लांडग्यांच्या कळपामध्ये राहणारा आणि लांडग्यांशी थोडं फार साधर्म्य असलेला हा अज्ञात प्राणी नेमका कोणता प्राणी आहे? याचं द ग्रॉस लँड संस्थेच्या संशोधकांनी संशोधन करण्याच ठरवलं. त्यानंतर त्यांच्यासमोर एक धक्कादायक माहिती समोर आली.

लांडग्यांच्या कळपामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची केस आणि त्याची विष्ठा गोळा करून संशोधकांनी NCBS अर्थात नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स ATREE अर्थात अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एनवोर्मेन्ट या प्रयोगशाळेकडे पाठविल्यानंतर संशोधकीचे डोळे अक्षरशः आवाक राहिले. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेली ही प्रजाती लांडगा किंवा श्वानाची नाही. तर वूल्फ डॉग प्रजाती असल्याच समजलं. जंगली लांडगे आणि भटक्या श्वानात संकरणं झाल्याने ही वूल्फ डॉग प्रजाती अस्तित्वात आल्याची धक्कादायक माहिती संशोधकांना मिळाली.

संशोधकांनी शोधून काढलेला अज्ञात प्राणी हा नेमका कोण आहे. तो लांडग्यांच्या कळपामध्ये का वावरत आहे? हे शोधण्याचा मोठं आव्हान संशोधकांसमोर होतं. मात्र संशोधकांनी ते आव्हान स्वीकारून त्या अज्ञात प्राण्याची केस आणि विष्ठा गोळा केली. त्या अज्ञात प्राण्याची विष्ठा आणि केस NCBS प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर हा अज्ञात प्राणी मात्र वूल्फ डॉग असल्याची माहिती संशोधकांना मिळाली

मात्र संशोधकांनी शोधलेली प्रजाती ही फक्त पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नाही. तर अहमदनगर आणि नाशिक सारख्या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी आढळला आहे. वूल्फ डॉग हा प्राणी नर आणि मादी या दोन्ही प्रकारात अस्तित्वात आला आहे.

लांडग्यासारखाच वूल्फ डॉग देखील लाजाळू प्राणी आहे. लांडग्यासारखा आक्रमक देखील आहे. मात्र वूल्फ डॉग ही प्रजाती मानवाने संशोधन करून तयार केली आहे. तो लांडगा आणि भटक्या स्वानांच्या संकरणातून अस्तित्वात आली आहे. वूल्फ डॉग या प्रजातीमुळे लांडग्यांचा जेनेटिक स्ट्रक्चर देखील धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT