Dog Attack on Child : भटक्या कुत्र्यांचा ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; घराबाहेर पडताच लचके तोडले; नागपुरातील भयानक घटना

Nagpur Dog Attack on Child : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा गावात मंगळवारी (ता. २१) घडली.
Nagpur Dog Attack on Child
Nagpur Dog Attack on ChildSaam TV

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

आई घरकामात व्यस्त असताना तीन वर्षाचा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, त्याचवेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा गावात मंगळवारी (ता. २१) घडली.

Nagpur Dog Attack on Child
Terrorist Attack : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

वंश अंकुश शहाणे (वय ३) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून मौदा परिसरात भटक्या कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. अनेकांना चावा घेऊन कुत्र्यांनी जखमी केलं आहे.

परिसरातील विविध वस्त्यांमध्ये मोकाट कुत्री फिरत असतात. अनेकदा ते लहान मुलांवर देखील हल्ला करतात. अशीच एक घटना मंगळवारी घडली. गणेश नगर परिसरात अंकुश शहाणे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना वंश हा ३ वर्षाच्या चिमुकला आहे.

मंगळवारी वंशची आई घरकामात व्यस्त होती. त्यामुळे वंश हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, त्याचवेळी दोन भटकी कुत्री बाहेर दबा धरून बसली होती. वंशला पाहताच या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला.

घटना इतकी भयानक होती, की यातील एका कुत्र्याने वंशची मान तोंडात घट्ट पकडली होती. तर दुसऱ्या कुत्र्याने त्याच्या खांद्याला पकडले होते. दरम्यान, वंशचा रडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे बाहेर आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले.

गंभीर अवस्थेत असलेल्या वंशला उपचारासाठी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यानच तीन वर्षीय चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची मौदा तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Nagpur Dog Attack on Child
Pune Car Accident: मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली; बापाला अटक, पबलाही टाळं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com