हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन सस्ता गुळगुळीत... Saam Tv
मुंबई/पुणे

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन सस्ता गुळगुळीत...

वर्षा बंगला ते विधान भवन या मार्गावरील काही किलोमीटरचा रस्ता हा गुळगुळीत करण्यात आला आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येणार असल्याची माहिती यापुर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. अशात मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होत असल्यामुळे प्रवासात त्याची दुखापत वाढू नये यासाठी वर्षा बंगला ते विधान भवन या मार्गावरील काही किलोमीटरचा रस्ता (Road) हा गुळगुळीत (Clean) करण्यात आला आहे. या रस्त्यावर असलेले खड्डे आणि स्पीड ब्रेकर यांमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन खडबडून जागे झाले.

हे देखील पहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास बळावळा होता. त्यामुळे ते मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होत. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतूल HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आता शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच ते हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) सभागृहात उपस्थित राहणार आहे. त्यामुळे वर्षा बंगला ते विधान भवन या मार्गावरील प्रवासादरम्यान रस्त्यांवरील खड्डे आणि गतिरोधकांमुळे त्यांच्या मानेची हालचाल होऊन त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने हा रस्ता अगदी गुळगुळीत केला आहे.

दरम्यान आजपासून सुरू होणारे हिवाळा अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राज्यातील गुन्हे, महिला सुरक्षा प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे शक्ती कायद्याबाबत महत्वाची चर्चा ही होणार आहे. शिवाय शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणात सत्ताधारी भाजपला जाब विचारू शकतात असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT