Rashmi Shukla Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Rashmi Shukla: मोठी बातमी! रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक होणार? केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ग्रीन सिग्नल

Rashmi Shukla News: केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

Satish Daud

Rashmi Shukla Latest News

केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ संपत असल्याने शुक्ला यांची महासंचालक पदावर निवड होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मानल्या जातात.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं शुक्ला यांची चौकशी सुरू केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती.

त्यामुळे रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकरणातील त्यांच्या विरोधातील चौकशी बंद झाली होती.

मुंबई हायकोर्टानं रश्मी शुक्लांच्या विरोधातील फोन टॅपिंग प्रकरणातील याचिका फेटाळून लावल्या होत्या. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. आता शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक बनण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shoking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT