२०२३ वर्ष संपायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्टसाठी अनेकांनी बाहेर फिरण्याचा प्लानही आखला आहे. अशातच महत्वाच्या ठिकाणांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसही सतर्क झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील (Mumbai) महत्त्वाच्या ठिकाणांवर तब्बल १३ हजार ५०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वाहतूक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल आणि शीघ्रकृती दलाचे जवान दिमतीला असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे.
कुणी नियमांचं उल्लघंन करताना आढळलं, तर त्यावर पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस (Police) दलाकडून २२ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २०५१ पोलीस अधिकारी व ११ हजार ५०० पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.
नववर्ष स्वागतानिमित्त गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बॅण्डस्टॅन्ड, जुहू चौपाटी या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करणार असून किनाऱ्यावरील गस्तीसाठी पोलीस स्पीड बोटीचा वापर करणार आहेत.
याशिवाय मद्यापी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार असून कुणी मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.