Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

फ्लोर टेस्टचा प्रयत्न झाला तर कोर्टात जाणार; शिवसेना नेत्याची माहिती

'शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढत फ्लोर टेस्टची मागणी केली तर शिवसेना कोर्टात जाण्याचा पर्याय स्विकारणार'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जर फ्लोर टेस्टचा प्रयत्न झाला तर शिवसेना कोर्टात जाणार असल्याचं शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीमुळे राज्य सरकार अडचणीत आलं आहे. शिवाय काल सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवरती ११ जून पर्यंत तरी निलंबनाची कारवाई करता येणार नसल्याचं सांगितलं आहे.

त्यामुळे शिंदे गटाला सकारात्मक असा निकाल कोर्टाने (Supreme Court) दिल्यामुळे त्यांनी सरकार स्थापनेबाबतच्या हालचालींना सुरुवात केली आहे. शिवाय सरकारचा पाठींबा काढण्यासाठीचे पत्र राज्यपालांना पत्र पाठविणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे जर शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढला तर सरकार अल्पमतात येऊ शकतं.

हे देखील पाहा -

याच पार्श्वभूमीवर आज अनिल देसाई यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'कायद्याच्या तरतुदींप्रमाणे सर्वकाही घडेल सुप्रीम कोर्टाने काल एक निकाल दिलेला आहे., त्यानुसार आमदारांच्या कारवाईसंदर्भात १२ तारखेनंतर सुनावणी होणार असल्यामुळे ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आपण त्यावरती भाष्य करणार नाही.

मात्र, फ्लोर टेस्ट सारख्या मागण्यांनी अडथळा निर्माण करण्यात येतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केले आहे. यात कायद्याच्या तरतुदींप्रमाणे पुढील गोष्टी होतील असं सांगतानाच ते म्हणाले जर ११ तारखेच्या आधी काही केलं तर शिवसेना (Shivsena) कोर्टात जाणार, असंही ते म्हणाले आहेत.

त्यामुळे आता शिंदे गटाने जर सरकारचा पाठिंबा काढत फ्लोर टेस्टची मागणी केली तर शिवसेना कोर्टात जाण्याचा पर्याय स्विकारणार असल्याचं देसाई यांनी जाहीर केल्यामुळे शिंदे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा या दोघांमध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते मे्हणाले, 'भाजपने ते काय करत आहे त्यांच्या हालचाली काय आहे ते माध्यमातून आम्हाला समजत आहे त्यामुळे पुढे काय करायचं हे पक्षनेतृत्व ठरवेल असं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

SCROLL FOR NEXT