पतीची हत्या करून घरातच पुरलेला मृतदेह तब्बल दोन महिन्यांनी बाहेर काढला... जयश्री मोरे
मुंबई/पुणे

पतीची हत्या करून घरातच पुरलेला मृतदेह तब्बल दोन महिन्यांनी बाहेर काढला...

आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुराणाऱ्या क्रूरकर्मा पत्नीला मुंबई च्या विनोबा भावे पोलिसांनी तिच्या साथीदारांसह अटक केली आहे.

जयश्री मोरे

मुंबई : आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुराणाऱ्या क्रूरकर्मा पत्नीला मुंबई च्या विनोबा भावे पोलिसांनी तिच्या साथीदारांसह अटक केली आहे. या महिलेने व तिच्या साथीदारांनी सदर व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह 18 जून रोजी घरातच पुरण्याचा निर्दयी आणि क्रूर प्रकार केला होता.

हे देखील पहा -

18 जून रोजी पुरलेला मृतदेह आज सकाळी फॉरेन्सिक डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढला आहे. मृत दिपक सांगळे हा 18 जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिली होती. तर, दिपक याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते, त्यामुळे तपासाला दिशा मिळत नव्हती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात दीपक हरवला नसून त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

दिपकची हत्या त्याचाच पत्नी ने केल्याचे तपासात उघड झाले आहे. खळबळजनक बाब म्हणजे पतीला जेवणातून बेशुद्ध होण्याचे औषध दिले आणि त्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दिपकचा मृतदेह घरातच पुरून दीपक हरवला असल्याचे नाटक रचण्यात आले. मात्र, पोलिसांनी हे नाट्य उधळून लावत हत्येचा छडा लावत 7 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मालेगाव निकालावर देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले... VIDEO

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार?

Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT