माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेडमधील असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद

छत्तीसगड येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील जवान, असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले आहेत. त्यांच्यावर उद्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेडमधील असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद
माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेडमधील असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीदसंतोष जोशी
Published On

नांदेड - छत्तीसगड येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील जवान, असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले आहेत. त्यांच्यावर उद्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

काल छत्तीसगड येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बामणी गावचे सुपुत्र, जवान सुधाकर शिंदे शहीद झाल्याची बातमी काल दुपारी कळताच संपूर्ण बामणी गावावर शोककळा पसरली आहे. सुधाकर शिंदे यांचे पार्थिव आज मध्यरात्री बामणी येथे पोहचणार असून उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गावकरी अंतिम संस्काराची तयारी करत आहेत.

हे देखील पहा -

शिंदे इंडो तिबेटीयन बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर कार्यरत होते. छत्तीसगड येथे नारायणपूर जवळ माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली. शिंदे यांचे शालेय शिक्षण मुक्रामाबाद येथील डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात झाले. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठातून सन २००० मध्ये त्यांनी कृषी विषयाची पदवी घेतली होती.

माओवाद्यांच्या हल्ल्यात नांदेडमधील असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद
ट्रक चालकासह दोघांचे हातपाय बांधून मारहाण करत २० लाखांची लूट!

२००१ मध्ये ते आयटीबीटी विभागात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. २०१९ मध्ये छत्तीसगड राज्यात नक्षली प्रतिबंधक पथकात त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शिंदे यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरयाणा, पंजाब सिमेवर सेवा बजावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com