मावळच्या शेतकर्‍यांवर गोळीबार झाला तेंव्हा पवार साहेब का गप्प बसले?; प्रवीण दरेकरांचा सवाल SaamTV
मुंबई/पुणे

मावळच्या शेतकर्‍यांवर गोळीबार झाला तेंव्हा पवार साहेब का गप्प बसले?; प्रवीण दरेकरांचा सवाल

राजकारणासाठी महाविकास आघाडीला लखिमपूर, आणि येथील घटनेतील शेतकऱ्यांच्या भावानांचा चक्काचुर.

दिलीप कांबळे

मावळ : महाराष्ट्रमध्ये लखिमपूर Lakhimpur येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं. मात्र मावळच्या शेतकर्‍यांवर गोळीबार Firing on Maval farmers झाला होता त्यावेळे पवार साहेब Sharad Pawar का गप्प बसले होते असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ते मावळच्या पिडीत कुटुंबाची भेट घ्यायला गेले त्यावेळी उपस्थित केला. तसेच आजचा हा बंद सरकार पुरस्कृत होता. बंद किती यशस्वी झाला किती प्रकारे दबाव तंत्राचा वापर करुन कुठे रिक्षा वाल्याला मारहाण करुन, कुठे रिक्षाची चावी काढुन घे, कुठे चंद्रपुरला दम दाटी कर, अशा संपुर्ण घटना महाराष्ट्रत घटना झाल्या आहेत. (Why you silent when farmers were shot in Mawla; Darekar's question to Sharad Pawar)

हे देखील पहा -

मी मावळच्या या तीन गावात एवढ्यासाठी आलो की मावळमध्ये 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळातील शेतकर्‍यांवर आमानुष गोळीबार झाला होता. त्याच्या स्मृती हे सरकार विसरले म्हणजे त्याला जालियनवाला बाग हत्याकांड बोलायचं त्या ठिकाणी पवार साहेबांना मावळातील घटना आठवली नाही का? असा सवाल करत दरेकर पुढे म्हणाले 'लखीमपुरला झालेली घटना त्या जालिवायन बाग हत्याकांड होऊ शकली म्हणजे आमच्या राजकारणासाठी महाविकास आघाडीला लखिमपूर, आणि येथील घटनेतील शेतकऱ्यांच्या भावानांचा चक्काचुर. अशा प्रकारचं आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या भावनांच्या संवदेना नाहीत म्हणुन ती उजागर या ठिकाणी बोलण्यासाठी आज आलो. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकरी उद्धवस्त झाला असल्याचही दरेकर म्हणाले.

महाराष्ट्रावर निसर्ग वादळाचं Nature storm संकट आलं, तोक्ते चक्री वादळांच Cyclonic storm संकट आलं, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुर्ण पणे उद्धवस्त झाला. मात्र या सरकारने काही मदत दिली नाही. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या काळात 2019 ला जो GR काढला. त्या माध्यामातुन एक अभूतपुर्ण सरसकट, पचंनामे न करता मदत झाली. परंतु काही दिवसापुर्वी मराठवाडा Marathwada, विदर्भामध्ये Vidarbha अतिवृष्टी Heavy Rain होउन जो शेतकरी पुर्ण पणे उद्धवस्त झाला आहे. पुढील चार ते पाच वर्ष काहीचं पिक येणार नाही. शेतकऱ्यांना एक दमडीची मदत केली नाही. आज त्या ठिकाणी पीक विमा मिळाला नाही.

देवेंद्रजींच्या काळात पीक विम्याचे पैसे भरले नव्हते तरी 50 टक्के पिक विमा दिला गेला. आज शेतकर्‍यांच्या पंपाच्या लाईट कापल्यात घराच्या लाईट कापल्यात. आता शेतं निट करायला एकरी काही हजाराचा खर्च आहे. त्याबद्दल काही नाही महाराष्ट्र मध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी मरतायत त्याच्याबद्दल कॅबिनेट मध्ये श्रद्धांजली वाहिली नाही. पंरतु लखिमपुरची घटना आमच्या येथील कॅबिनमध्ये आम्ही श्रद्धांजली वाहतो.आणी त्याचं राजकारण करतो. श्रद्धांजली वाहायला ही हरकत नाही. लखिमपुरची घटना वाईटचं आहे. आम्ही त्याचा निषेधचं करतो. गृहराज्य मंत्र्याच्या मुलाल अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. असं देखील दरेकर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT