दिवा : राज्यात पुकारलेल्या बंदसाठी दिवा शहरात Diva City दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र दिवा शहरातील साबे गावातील दोन दुकानदारांना अर्धे दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप BJP कडून करण्यात आला असून याबाबत त्यांनी एक CCTV समोर आणलं आहे. दुकानदारांनेही याबाबत दिवा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. मात्र या आरोपांना शिवसेनेनी फेटाळून लावत यात राजकारण करू नये असे सांगितले.(Shiv Sainiks beat up shopkeeper in Divya ?; BJP gave CCTV evidence)
हे देखील पहा -
साबे रोडवरील अष्टविनायक नगर येथे राम प्रजापती यांचे राजू सरबत, स्नॅक्स कॉर्नर दुकान असून कैलाश कुमावत याचे कैलाश फरसाण मार्ट आणि दूध डेअरी आहे. या दोन्ही दुकानदारांनी बंद पाळाला होता, मात्र दुपारच्या वेळी राम त्याच दुकानात राहत असल्याने हवा येण्यासाठी अर्धे शटर उघडे ठेवले तर कैलाश यांनी दुकान बंद करून बाहेर उभे राहून दूध विकत होते. तेवढ्यात एक रिक्षा आली, त्यातून तीन लोक उतरली आणि त्यातील एकाने त्या दुकानदारांना मारहाण करत दुकान पूर्ण बंद करा असे सांगितले. याबाबत बाजूचा दुकानदार आणि भाजप पदाधिकारी सचिन भोईर Sachin Bhoir यांनी ते तीन जण शिवसैनिक होते असे सांगितले आणि शिवसैनिकाच्या रिक्षाच्या पाठी नगरसेवकाची गाडी सुद्धा आहे असा आरोप केला. मात्र हा आरोप शिवसेनेकडून फेटाळण्यात आला आहे.
मारहाण झालेल्याच्या शेजारच्या दुकानदारांने सांगितले 'आज महाराष्ट्र बंद Maharashtra Bandha मध्ये हे ही सहभागी होते मात्र ते दुकानांमध्येच राहत असल्याने दुकानाचे शटर थोड उघडं होता जेणेकरून आपल्या दुकानात हवा येईल. तरी सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करत शटर उघडून आत मध्ये प्रवेश करत त्यांना मारहाण केली.'
दरम्यान भाजपच्या सचिन भोईर यांनी सांगितले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दिव्यातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला आणि दुकान बंद असताना सुद्धा छोट्या व्यापाऱ्यांना मारझोड केली आहे आणि तो प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. या घटनेचा जाहीर निषेध करत भोईर म्हणाले यासंदर्भात तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे आणि यानंतर कायदेशीर गोष्टींसाठी आम्ही त्या व्यापाऱ्यां सोबत आहोत.
मात्र शिवसेना शहरप्रमुख आणि नगरसेवक रमाकांत मढवी यांनी म्हणाले ''शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंद पुकारला होता. दिव्यातही कडकडीत बंद आहे, एखाद्याने दुकान उघडले ठेवले असेल आणि त्याला जर दुकान बंद करण्याची विनंती करण्यात आली तर त्यात चुकीचे काय. व्हिडीओ मध्ये कोणीही कोणाला मारहाण करताना दिसत नाही.उगाच अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. वेगळा रंग याला देऊ नये. भाजपाने राजकारण करण्यापेक्षा किमान शेतकऱ्यांप्रती तरी प्रामाणिक राहावे.'
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.