Nana Patole Saam Tv News
मुंबई/पुणे

काँग्रेस नेते लता दीदींच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? पटोलेंनी दिले उत्तर

नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण अमित देशमुख हे कोणीच उपस्थीत नव्हते.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: काल गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झाले. मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील नेते, अभिनेते उपस्थीत होते. परंतु यासाठी कोणी काँग्रेसचे नेते दिसले नाही. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण अमित देशमुख हे कोणीच उपस्थीत नव्हते. त्यामुळे प्रश्न विचारले जात होते. आता नान पटोलेंनी (Nana Patole) त्याचं स्पष्टीकरण दिले आहे.

नेते कोरोना पॉझिटिव्ह

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत असे नाना पटोले म्हणाले. माझ्या बहिणीच्या सासू वारल्यामुळे मी तिकडे होतो, आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते. महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले. (Balasaheb Thorat, Ashok Chavan, Amit Deshmukh Corona Positive)

अस्लम शेख सुद्धा मुंबई बाहेर होते. वर्षा गायकवाड मुंबई बाहेर होत्या शनिवार रविवार मुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या त्यांचे योगदान एवढे मोठे आहे. मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जात असल्याचं नाना म्हणाले.

शाहरुखच्या प्रकरणावरुन नाना म्हणाले...

प्रत्येकाला संविधानाप्रमाणे स्वातंत्र्य आहे की आपल्या धर्मानुसार वागावे. काहीजण मुद्दामून धर्मावर टीका करून मोठे करण्याचे काम करत आहे. काही जणांनी दुसऱ्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालायचं कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

लता दीदी स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं

लतादीदी यांचा स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं हे काँग्रेसची भूमिका असल्याचं नाना म्हणाले. लतादीदी यांनी पेडर रोडच्या उड्डाणपुलाचा जेंव्हा विषय आला होता तेव्हा त्यांनी मला डिस्टर्ब होईल म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी आघाडीचे सरकार होतो आणि तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि उड्डाणपूल पेडर रोडला झाला नाही अशी आठवण यावेळी नाना पटोलेंनी सांगितली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधींसह इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

बदलापूरमध्ये पाणी संकट; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या सोसायटीत कधी असणार पाणी बंद?

काँग्रेसचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड, राहुल गांधींनी केले दु:ख व्यक्त; राजकारणात हळहळ

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT