आधी रासायनीक, नंतर जैविक अन् आता पिकवली होमिओपॅथीक 'मिर्ची'

होमिओपॅथीच्या औषधांचा (Homeopathic Medicines) वापर हा मानवाच्या उपचारासाठी केला जातो.
आधी रासायनीक, नंतर जैविक अन् आता पिकवली होमिओपॅथीक 'मिर्ची'
आधी रासायनीक, नंतर जैविक अन् आता पिकवली होमिओपॅथीक 'मिर्ची' Saam TV
Published On

बारामती: आतापर्यंत तुम्ही रासायनिक, जैविक, सेंद्रिय, एकात्मिक शेतीचे अनेक प्रयोग ऐकले असतील, पाहिले असतील, पण होमिओपॅथीक शेती असं काही ऐकलं आहे का? नाही ना पण बारामतीत खरोखरच अशा प्रकारची होमिओपॅथी वरची शेती यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पहिल्यांदाच बारामतीत नेदरलँडच्या स्चकॉ बोनेट या जातीची गोड मिरची व ढोबळी मिरची होमिओपॅथी औषधावर यशस्वीरित्या उत्पादित करण्यात आली आहे.

होमिओपॅथीच्या औषधांचा (Homeopathic Medicines) वापर हा मानवाच्या उपचारासाठी केला जातो. मात्र आता होमिओपॅथी औषधांचा वापर हा शेतीसाठी केला जात आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट या मिरचीच्या वानाची लागवड करण्यात आली आहे. आणि ही संपूर्ण मिर्चीवर होमिओपॅथीची औषध वापरून वाढवण्यात आली आहे. हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. मिरची म्हटलं की तिचा तिखटपणा. परंतु ही मिरची खायला गोड लागते. आणि त्याच मिरचीवर फवारणीसाठी आणि तिच्या वाढीसाठी संपुर्ण होमिओपॅथीची औषध फवारणी केली आहे. विशेष म्हणजे या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत 3 पट कमी आहे. (Cultivation of chillies from homeopathic medicines)

आधी रासायनीक, नंतर जैविक अन् आता पिकवली होमिओपॅथीक 'मिर्ची'
IPL 2022: मेगा लिलावातून बाहेर पडले 'हे' 6 स्टार खेळाडू

कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ञ डॉ. वीरेंद्र पाटील यांच्या संशोधीत होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचे पीक घेण्यात आले आहे. आणि सध्या वेगवेगळ्या रंगातील लगडलेली मिरची याचा प्रत्यय देत आहे. याच होमिओपॅथी तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांवर होतो अस डॉक्टर पाटील सांगतात.

बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातही अत्यंत कमी खर्चात ही मिरची उत्पादित करण्यात आली आहे. तसेच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आला आहे. ज्याचा खर्च शेडनेट किंवा पॉलिहाऊस पेक्षा खूप कमी आहे.

रोगाचा होमिओपॅथी औषधावर आधारीत तंत्रज्ञानाद्वारे केवळ वीस हजार रुपयात एका एकर मिरचीचे उत्पादन यशस्वीरित्या घेता येऊ शकते ते येथे दाखवून देण्यात आले आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान होमिओपॅथीसह विविध प्रयोग शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये पाहायला मिळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com