Leopard attacks increasing in Pune Saam TV Marathi news
मुंबई/पुणे

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

Leopard attacks increasing in Pune district : जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतेय. हरणं-ससे खाणारे बिबटे आता कुत्री आणि माणसांवर हल्ले करतायत. सरकारनं स्थलांतराची योजना आखली असली, तरी नागरिकांना सुरक्षितता केव्हा मिळणार हा प्रश्न कायम आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra government leopard relocation plan : जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबटे दिवसेंदिवस नरभक्षक होतायत...मात्र बिबट्याची दहशत नेमकी का वाढतेय? बिबट्यांचा हिंस्रपणा वाढण्य़ामागे नेमकी काय कारणे आहेत? या नरभक्षक बिबट्यांच्या नियंत्रणासाठी सरकारनं काय उपाययोजना केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ही दृश्य नीट पाहा....बिबट्याच्या हल्ल्यापासून काळेचीवाडीत झोक्यावर खेळणारा हा चिमुकला थोडक्यात बचावलाय...होय.. कारण अंगणात खेळता खेळता बिबट्या आला आणि यां बिबट्याला पाहून घाबरलेल्या मुलानं घरात धूम ठोकली...त्यानंतर आरडा ओरडा झाला आणि बिबट्या पळाला आणि मुलगा थोडक्यात बचावल...मात्र हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाल्यानं जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांची मानवी वस्तीत किती दहशत आहे, हे उघड झालं...

उत्तर पुण्यातील शिरुर, खेड, जुन्नर परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतोय. कुठे रात्रीच्या वेळी ऊसाच्या फडात बिबट्यांचा दहशतीमुळे शेतकरी भयभीत झालेत... एकेकाळी हरणं, ससे खाणाऱ्या बिबट्यांच्या निशाण्यावर कुत्री, कोंबड्या आल्या. आणि त्यामुळेच कुत्र्यांची संख्या कमी झाली असून बिबटे नरभक्षक झाल्याचं दिसतंय.

शिरुरमध्ये तिघांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डार्ट मारल्यावर नरभक्षक बिबट्या चवताळला.. ज्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानं बिबट्याला गोळ्या घालण्यात आलेत... तसचं 13 वर्षीय मुलाचा बळी घेणारा तोच बिबट्या आहे का? याचाही तपास केला जातोय.. मात्र बिबट्यांच्या या बदललेल्या शिकारी वृत्तीमुळे गावकऱ्यांचा संरक्षणासाठी खर्चही वाढलाय..

सरकारनं बिबट्यापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही निर्णय घेतले आहेत. जुन्नरमधील बिबट्यांच्या स्थलांतरासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय...बिबट्यांच्या स्थलांतरासाठी सव्वा अकरा कोटींची मंजुरी मिळालीय... त्यामुळे वनतारा आणि वनतारा किंवा बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात बिबट्याचं स्थलांतर केलं जाणार आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी पंधरा दिवसात बिबट्यांसाठी 700 पिंजरे तयार करणार आहेत.मात्र या उपाययोजनांवर तातडीनं अंमलबजावणी होणार का? आणि हे निर्णय पुरेसे आहेत का? पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांना बिबट्याच्या जीवघेण्या दहशतीपासून लवकर आणि पूर्ण मुक्ती मिळणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा, शाखा अध्यक्षांची घेणार बैठक

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT