Ratan Tata Successor Saam Tv
मुंबई/पुणे

Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

Ratan Tata Passes Away: गेल्या काही काळापासून आजारी असलेले उद्योगपती आणि माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं निधन झालं. त्यांच्य्या नंतर आता टाटा समूहाची जबाबदारी कोण घेणार? हेच आपण जाणून घेणार आहोत...

Satish Kengar

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यवसायासोबतच त्यांनी सामाजिक कार्यातही मोठं योगदान दिलं. आपल्या सामाजिक कार्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. रतन टाटा याना मुलं नसल्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारावर अजूनही सस्पेंस आहे. अशातच टाटांच्या ३३.७ ट्रिलियन रुपयांच्या साम्राज्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सावत्र भाऊ नोएल टाटा असतील रतन टाटा यांचे उत्तराधिकारी?

रतन टाटा यांच्या संभाव्य उत्तराधिकारींमध्ये नोएल टाटा हे प्रबळ दावेदार मानले जातात. नवल टाटा यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे पुत्र नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. यामुळेच टाटा वारसा मिळवण्याच्या बाबतीत नोएल टाटा पहिल्या क्रमांकावर येतात, असं बोललं जात आहे.

मात्र वय लक्षात घेता ही जबाबदारी त्याच्या तीन मुलांपैकी कोणत्याही एका मुलावर दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. नोएल टाटा यांच्या तीन मुलांमध्ये माया टाटा, नेव्हिल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त रतन टाटा यांचा एक लहान भाऊ जिमी टाटा देखील आहे. जे आतापर्यंत टाटा समूहाच्या कामकाजापासून दूर राहिले आहेत.

नोएल टाटा यांच्या तीन मुलांवर सध्या कोणती जबाबदारी आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, माया टाटा समूहात लक्षणीय प्रगती करत आहेत. बायस बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमधून शिक्षण घेतलेल्या माया यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. टाटा नवीन ॲप लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यावरून त्यांची धोरणात्मक कुशाग्रता आणि दूरदृष्टी दिसून येते.

यातच नेव्हिल टाटा कौटुंबिक व्यवसायात खोलवर गुंतलेले आहेत. टोयोटा किर्लोस्कर ग्रुप कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे. स्टार बाजार हे नेव्हिल ट्रेंट लिमिटेडच्या अंतर्गत प्रमुख हायपरमार्केट चेनचे प्रमुख आहे. यात लिया टाटा सर्वात ज्येष्ठ आहेत. त्या टाटा ग्रुपच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करतात. स्पेनमधील आयईमध्ये शिक्षण घेतलेल्या लेया यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दरम्यान, पुढील घडामोडी फक्त टाटांच्या कॉर्पोरेट नेतृत्वाचे भविष्य ठरवणार नाहीत, तर देशातील सर्वात प्रतिष्ठित गटाची भविष्यातील दिशाही यातूनच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT