Shivsena Vs Rana Saam TV
मुंबई/पुणे

रुग्णालयात स्फोट झाला असता तर जबाबदार कोण? राणांच्या 'त्या' फोटोवरुन शिवसेना आक्रमक

रुग्ण MIR कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायला सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेला.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना काही दिवसांपुर्वी लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांचे पती आमदार रवी राणा हे त्यांना भेटायला रुग्णालयात आले असतानाचे अनेक भावनिक फोटो आणि व्हि़डीओ व्हायरल (Viral Video) झाले होते. मात्र, याच रुग्णालयातील एक फोटो चांगलाच वादग्रस्त झाला आहे. हा फोटो लीलावती रुग्णालयातील एमआयआर कक्षातील असून या फोटोमुळे आता लीलावती रुग्णालय प्रशासन अडणीत सापडले आहे. कारण, आता या फोटोच्या मुद्द्यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून नवनीत राणा यांना हॉस्पिटल प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी (Kishori Pednekar) पेडणेकर यांनी केला आहे.

एखादा रुग्ण MIR कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यावेळी जर रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. आहे आज किशोरी पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला त्या फोटोबाबत जाब विचारला.

मात्र, नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये असतांना त्यांच्यासोबत कोणी नव्हत, हा व्हिडीओ बाहेरून व्हिडिओ घेण्यात आला असल्याचं लीलावती हॉस्पिटल स्टाफकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी रवी राणा यांचा आतील केलेला व्हिडिओ दाखवत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी शिवसेना आमदार मनीषा कायंदे देखील उपस्थित होत्या.

हे देखील पाहा -

तसंच या फोटो प्रकरणामुळे पोलिसांनी लीलावती हॉस्पिटलच्या इमेजला धक्का लावला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे करणार असल्याचही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, शिवसेनेकडून हॉस्पिटलला एक निवेदन सादर करण्यात आलं असून नवनीत राणा यांचे काढलेले फोटो, यावेळी उपस्थित गन मॅन, सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत फोटो कसे काढले गेले हे लेखी द्यावे असे निवेदन पत्र देण्यात आल्याचे मनिषा कायंदे यांनी सांगितलं.

तसंच नवनीत राणा यांचे जे फोटो काढले,ज्या आजारासाठी त्या आल्या त्यांच्यावर उपचार केले गेले ते नियम बाह्य आहे. सेन्सेटिव्ह एरियामध्ये फोटोग्राफी केली गेली. हॉस्पिटलचे नियम तोडले गेले. हॉस्पिटलच्या काळजीपोटी आम्ही येथे आलो आहोत. या हॉस्पिटलमध्ये अनेक VIP येत असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. स्टाफला धमकावत कोणी फोटोग्राफी केली का? आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. नर्स स्टाफ ला दबाव कोणी आणला का? असे अनेक प्रश्न मनिषा कायंदे यांनी यावेळी उपस्थित केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

SCROLL FOR NEXT