When will Pune Hinjewadi Metro start operation in 2025? 
मुंबई/पुणे

Pune Metro : हिंजवडीची वाहतूक कोंडीची कटकट झटक्यात संपणार, या तारखेला धावणार मेट्रो

Hinjewadi Traffic : पुणे मेट्रो लाईन ३ च्या मार्गावर सप्टेंबर २०२५ पासून सेवा सुरू होणार, वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार आहे. बालेवाडी ते मेगापोलिस सर्कल मेट्रो मार्ग सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होणार; PMRDA कडून काम अंतिम टप्प्यात.

Namdeo Kumbhar

PMRDA to open 13-km stretch of Metro Line 3 by September : हिंजवडी आयटी पार्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय राहिलेला आहे. सध्या वाहतूककोंडीमुळे हिंजवडीची पुण्यात चर्चा होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हिंजवडीतील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या झाली आहे. आजही, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आयटी पार्क हिंजवडीमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली. फेज 2 आणि फेज 3 च्या रस्त्यावरती मोठा चक्काजाम झाला आहे. मेट्रोचं काम सध्या या परिसरामध्ये सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत, त्यामुळे मोठी वाहतुकीची समस्या कायम जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेत्यांकडून वारंवार टीका होते. वाढता रोष पाहून पुणे मेट्रोने हिंजवडीमधील मेट्रो मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

When will Pune Hinjewadi Metro start operation in 2025?

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA ने मेट्रोच्या एका मार्गावर लवकरच सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यावर्षी सप्टेंबरपर्यंत २३ किमीच्या मेट्रो लाईन ३ पैकी १३ किलोमीटरचा मार्ग ( मेगापोलिस सर्कल ते बालेवाडी फाटा ) सुरू करण्याचं नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो लाईन ३ ही २३.३ किमी लांबीची आहे, या मार्गावर २३ मेट्रो स्थानके आहेत. यापैकी १३ किमीचा मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. PMRDA आणि टाटा ग्रुप व सिमेन्स यांच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे.

Hinjewadi Phase 2 traffic solution through Pune Metro

मागील सहा महिन्यांपासून हिंजवडीमधील वाहतूक कोंडींची चर्चा सगळ्या पुण्यात सुरू आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. हिंजवडीमध्ये नदी वाहत असल्याची परिस्थिती झाली होती. मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे वाहतूककोंडीसह इतर समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. लोकांचा राग, संताप अन् रोष कमी करण्यासाठी पुणे मेट्रोकडून या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत बालेवाडी फाटा -मेगापॉलिस सर्कल या १३ किमी मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.

Metro Line 3 Hinjewadi to Balewadi launch date PMRDA

२०२१ मध्ये मेट्रो ३ चे काम सुरू झाले आहे. हे काम दोन टप्प्यांमध्ये केले जात आहे. मार्च २०२६ पर्यंत मेट्रो ३ चे काम १०० टक्के पूर्ण होण्याची शक्यता पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्याने एचटी सोबत बोलताना व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात मान ते बालेवाडी फाटा या 14 किलोमीटरच्या मार्गावर यावर्षीच्या अखेरीस चाचणी आणि आंशिक सेवा सुरू होईल, १३ स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतात सरासरी मेट्रो बांधकामाला प्रति किलोमीटर 8 ते 14 महिने लागतात. 23 किलोमीटरच्या मार्गासाठी पूर्णत्वाचा कालावधी चार वर्षांहून अधिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT