Shivsena-Sambhaji Brigade
Shivsena-Sambhaji Brigade Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena-Sambhaji Brigade : ...म्हणून शिवसेना-संभाजी ब्रिगेड आले एकत्र; नेत्यांनी काय काय सांगितलं?

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

Shivsena-Sambhaji Brigade News Update | मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे.

प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचं कारण संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचं सरकारही कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपनं एकत्रित येत राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातील अनेक आमदार आणि खासदारही गेल्यामुळं शिवसेना पुन्हा उभी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंसह त्यांच्यासोबत असलेल्या महत्वाच्या नेत्यांसमोर आहे.

शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसोबत असतानाच आता शिवसेनेला नवीन सहकारी मिळाला आहे. संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागची कारणंही संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केली आहेत.

पाहा व्हिडीओ -

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, संभाजी अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली. शिवसेनेसोबत ते एकत्र येत असल्याचे या बैठकीत ठरले. त्यांनी राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आहे. एकत्रित मेळावे घेण्याविषयी चर्चा झाली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनवरे म्हणाले की, 'नवीन समीकरण राज्यात तयार होत आहे. आमची संघटना ३० वर्षांपासून काम करत आहे. संघप्रणित विचारांचा उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. लोकशाही अस्तित्वात ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र आली आहे.'

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, 'धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादाविरोधात आम्ही लढत आहोत. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकांमध्येही आम्ही आता शिवसेनेसोबत आहोत. नवीन समीकरणं घेऊन आम्ही भविष्यात एकत्र राजकीय वाटचाल करत आहोत.'

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: कन्यासह ४ राशीसाठी बुधवार खास, तुमची रास?

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

SCROLL FOR NEXT