Akola News : न्यायाधीश साहेब, माझा पोलिसांवर विश्वास नाही; तरुणाने व्हिडिओ बनवला अन्...

आत्महत्येसाठी अनेक पोलिसांना धरले जबाबदार...
Akola News
Akola NewsSaam Tv

अकोला- जिल्ह्यातील उगवा गावात दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाला वेगळेच वळण आलं आहे. आत्महत्या केलेल्या आशिष अडचुले (वय ३५ वर्ष, राहणार उगवा) याचे दोन-तीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल होत आहेत.

या व्हिडिओमध्ये त्याने अकोल्यातील (Akola) अकोट फैल पोलिसांनी (Police) केस दाबण्यासाठी १ लाख रुपयांसह हप्ते घेतल्याचा आरोप केला आहे. आता या सर्व पोलिसांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. न्यायाधीश साहेब माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही, तुम्हीचं लक्ष दया... असे व्हिडिओ बनवत आशिषने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर यांच्याकड चौकशी सोपवली आहे.

हे देखील पाहा-

काय आहे प्रकरण?

अकोल्यातील उगवा येथील सुभाष भातकुले (३६) आणि आशिष अडचुले (३५) या दोघांनी २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु आशिषने आत्महत्या पूर्वी तीन व्हिडिओ तयार केले असून आत्महत्येला अनेक जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आशिषने आत्महत्या पूर्वी बनवला व्हिडिओ...

न्यायाधीश साहेब... माझं शेवटचं बयाण आहे, अकोट फैल पोलिसांनी माझी फसवणूक केली. माझ्याकडून पाच गुटख्याचे पाकीट पकडले आणि पोलिसांनी माझ्याकडून एक लाख रुपये घेतले. तुझ्यावर कारवाई करत नाही, तू पैसे दे पैसे घेतल्यानंतर सांगितलं की वरुन खूप दबाव आहे. आता तुझ्यावर कारवाई करावीच लागते.

तू टेंशन घेवू नको, तुला पोलीस कोठडी मागत नाही. अशा पद्धतीने तुझ्यावर कारवाई करतो, अशा प्रकारे दबाव आणला. नितीन सुशील, पांडे साहेब, इंगळे साहेब, असलम साहेब, तोपकर मेजर, दाते मेजर, छोटू पवार हे सर्व कर्मचारी आहे. सर्व अकोट फैल पोलीस ठाण्यातील आहेत. त्यात आणखी दोघांचा समावेश असून त्यांची नावे मला आठवत नाहीत. या सर्वांनी मला दबावात घेत माझ्यावर कारवाई केली. मी दुकानदार आहे काही गुन्हेगार नाही.

न्यायाधीश साहेब, माझा व्हिडिओ तुमच्या पर्यंत येईल, तुम्ही योग्य रीतीने कारवाई कराल आता पोलिसांवर माझा विश्वास राहिला नाही. भांडे आणि येणकर मेजर यांना देखील हप्ते दिले, माझ्याजवळ कुठलाही मुद्देमाल सापडला नव्हता. परंतु तरीही पोलिसांनी चुकीची कारवाई केली. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. असा व्हिडिओ तयार करत आशिषने आत्महत्या केली आहे.

Akola News
दारूच्या नशेत 'त्या' श्वानाची हत्या; तरुणाशी झालेल्या वादाचा काढला राग

चौकशीअंती पुढील कारवाई केली जाणार..

दरम्यान, मृतक आशिष अडचुले याच्याविरुद्ध अकोट फेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने पोलिसावर केलेले आरोप निराधार आहेत. त्याच्या कुटुंबियांनी अद्याप पोलिसांविरोधात तक्रार दिलेली नाही आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. या संदर्भात पुढील तपास शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर करीत आहे.

अकोट फैल पोलीस ठाण्यात आशिष अडचुले याच्याविरुद्ध ऑक्टोंबर २०२१ मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. तसेच त्याच्यावर मारहाण केल्याप्रकरणात भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे. व्हिडिओमध्ये त्याने न्यायाधीशासोबतच, पोलीस आणि नागरिकांनाही शिवीगाळ केली आहे. तो व्यसनाधिन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com