ajit pawar group meeting  Saam tv
मुंबई/पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सुनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

ajit pawar group : राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास झाले आहेत. यासाठी सुनील तटकरेंची भूमिका महत्वाची ठरली.

Vishal Gangurde

सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यात

सुनेत्रा पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २ ठराव पास

सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सुनेत्रा पवार आज शनिवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी २ ठराव पास करण्यात आले. खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसची ३१ जानेवारी रोजी २ वाजता विधानभवनात विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षेताखील बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आले.

कोणते ठराव पास झाले?

सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतापदी एकमताने निवड करण्यात आली.

सुनेत्रा अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढणे आणि विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन ठराव घेण्यात आले. महाराष्ट्र विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात यावी आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याबाबतचे हे दोन ठराव छगन भुजबळ यांनी मांडले. या दोन्ही ठरावास  हसन मुश्रिफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोड यांनी अनुमोदन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, नंतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार; 14 वर्षीय पीडित मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT