Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरे कुटुंबावर सोमय्यांनी कोणकोणते आरोप केले? जाणून घ्या सविस्तर

श्रीधर महादेव पाटणकर यांची श्रीजी होम्स ही कंपनी आहे. ती शिवाजी पार्कला असून ती बिल्डींग करोडो रुपयांची आहे. या कंपनीत २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये मनी लाँडरिंग द्वारे आले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) परिवाराचे पैसे मनी लाँडरिंग करायला मदत करणारा पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी याला कोठे लपवलं आहे. असा प्रश्न विचारत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नेहमी प्रमाणे ठाकरे परिवारासह, ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले.

सोमय्यांनी केलेल आरोप -

मुख्यमंत्र्यांची दोन्हीं मुलं आदित्य आणि तेजस ठाकरे (Aditya And Tejas Thackeray) तसेच मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे नंदकिशोर चतुर्वेदी सोबत अनेक आर्थिक व्यवहार आहेत.

हवाला किंग एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishore Chaturvedi) गायब आहे. आपण तपास यंत्रणांशी बोललो असून त्या यंत्रणा त्याचा शोध घेत असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. तसंच चतुर्वेदीला कुठे लपवला आहे हे सरकारने सांगाव अन्यथा त्याला फरार घोषीत करावं अशी मागणी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ठाकरे सरकारने अनेक गैरव्यवहारात चतुर्वेदीची मदत घेतली -

चतुर्वेदीने करोडो रुपयांचे मनी लॉडरिंग (Money laundering) केलं आहे, राज्य सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या दीड डझन कंपन्यामधील पैसा त्यांने गुंतवण्यास मदत केली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हातात येत नाही, सरकारचं त्याला संरक्षण आहे. मात्र, काही दिवसात ईडी इन्कम टॅक्स त्याच्या विरोधात वॉरंट काढेल असा विश्वास सोमय्यांनी व्यक्त केला.

नंदकिशोर चतुर्वेदी याच्या एक डझन कंपनीची यादीही सोमय्यांनी माध्यमांकडे दिली.

नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेंसह तेजस ठाकरेंवर मी जे आरोप केले त्यामध्ये ७ करोडचे मनी लाँडरिंग झालं आहे. श्रीधर महादेव पाटणकर (Sridhar Patankar) यांची श्रीजी होम्स ही कंपनी आहे. ती शिवाजी पार्कला असून ती बिल्डींग करोडो रुपयांची आहे. या कंपनीत २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये मनी लाँडरिंग द्वारे आले आहेत. उद्धव ठाकरे कंपनीला ओळखतात तीचे कार्यालय बांद्राला आहे. ती चालवणारा पार्टनर ठाकरेंचा मेव्हणा असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं.

तसंच ही कंपनी पार्टनरशिप फर्म नुसार कंपनी चालते. काळा पैसा या कंपनीत आला आहे. मनी लाँडरिंग कोणत्या चतुर्वेदीची मदत घेतली आणि तुमचा संबंध काय उद्धव ठाकरेंनी सांगावं असं आव्हान सोमय्यांनी केलं.

एकूण मनी लाँडरिंग २९ कोटी ६२लाख २९हजार ३२० रुपयांचं

पहिली एन्ट्री ५ कोटी ८६ लाख ८० हजार ९०२ रुपये

दुसरी एन्ट्री २३ लाख ७५ लाख ४८ हजार ४१८ रुपयांची आहे.

श्रीजी होम्स इमारतीमध्ये पार्टनर, संचालक आहेत श्रीधर पाटणकर आणखी दोन प्राईव्ट कंपनी आहेत.

प्रवीण कलमे फरार घोषीत करा...

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे वाझे अर्थात प्रवीण कलमे यांने माझ्या विरोधात अनेक तक्रारी केल्या. ते आता प्रवीण कलमे कुठे आहे? याचं उत्तरं मुख्यमंत्री देणार का? कलमे यांच्यावर गुन्हा दाखल आहे पोलीस त्यांना शोधत असताना ते गायब आहेत SRA च्या अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.

आता प्रवीण कलमे (Pravin Kalame) हे परदेशात पळाले आहेत का ? त्यांना कोणी मदत केली?

मुख्यमंत्री की जितेंद्र आव्हाड का अनिल परब (Anil Parab) यांनी मदत केली. पोलिस शोधत आहेत कलमे गायब आहे ठाकरे सरकार का कारवाई करत नाही एसआरने नोंदवली आहे. प्रवीण कलमे यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरली आहेत. प्रवीण कलमेला फरार घोषीत करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT