Two Mumbai local trains came face-to-face on the same track near Charni Road station, but alert motormen prevented a major disaster. saam tv
मुंबई/पुणे

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

Mumbai Local Train On One Track: मुंबईतील चर्नी रोड स्थानकाजवळ एकाच रुळावर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्या. मोटरमॅनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात थोडक्यात टळला. पश्चिम रेल्वेने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

Bharat Jadhav

  • चर्नी रोड स्थानकाजवळ दोन लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या.

  • मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला.

  • घटना सायंकाळी ५.२५ ते ५.३४ दरम्यान घडल्याची माहिती.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर चर्नी रोड स्थानकाजवळ एकाच रुळावर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे दोन्ही गाड्या वेळेत थांबवण्यात आल्याने संभाव्य भीषण अपघात टळला. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी सुमारे ५.२५ ते ५.३४ या वेळेत घडली. सीएसएमटीकडे जाणारी एक लोकल ट्रेन चर्नी रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येत असताना, विरुद्ध दिशेने येणारी दुसरी ट्रेन त्याच रुळावर आल्याचा दावा करण्यात आला आहे. समोरून ट्रेन येत असल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ ब्रेक लावत ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या घटनेबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे घटनेचे नेमके कारण आणि स्वरूप स्पष्ट होणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हाजीपूरमध्ये बिघाड? ४ मिनिटं एकाच जागी हवेत हेलकावे, उपमुख्यमंत्रीही सोबत, राजकारणात खळबळ

Sunday Horoscope: उत्साहाने दिवसाची सुरुवात होणार; 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mangalsutra Trendy Design: साडीपासून ते जिन्स टॉपवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स, मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत एका सोसायटीमध्ये लिफ्टचा अपघात

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

SCROLL FOR NEXT