Western Railway Disrupted Saam Tv
मुंबई/पुणे

Western Railway : परतीच्या पावसामुळे मुंबईकरांचा खोळंबा; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवासी ताटकळले

Western Railway Disrupted: पालघरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. याचसोबत लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसाने पालघरला झोडपून काढले. पालघर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. वानगाव रेल्वे स्थानकावर पहाटे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. पालघर येथे काही काळ सिग्नल देखील फेल झालं होतं, तर केळवे रेल्वे स्थानक परिसरात देखील रेल्वे रुळावर पाणी आले होते.

पालघरमध्ये पहाटेपासून पाऊस थांबला असून ट्रॅकवरील पाणी आता ओसरले आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड देखील दुरूस्त झाला आहे. सध्या रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. पण उशिराने सुरू आहे. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचसोबत लोकलसेवा देखील उशिराने सुरू आहे. सध्या मुंबईकडे जाणारी लोकलसेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे पालघर, वसई, विरार याठिकाणावरून मुंबईमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना उशिर झाल्यामुळे लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT