Western Railway Services Disrupted Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मोठी बातमी! पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Western Railway Services Disrupted: मुंबईतुन मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित झाली आहेत. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित झाली आहे. जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. गाड्या १५ ते २० मिनटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं चित्र आहे. अचानक गाड्या उशिरा धावत आहेत, त्यामुळे नोकरदारांची मोठी धांदल उडाली आहे. कामावर जाण्यास त्यांना उशीर होणार असल्याचं दिसत आहे.

बोरिवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची (Western Railway) सेवा विस्कळित झाली आहे. केबल तुटल्याने बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झालं आहे. घटनास्थळी केबल दुरुस्तीचं काम सुरू असल्याची माहिती मिळत (Western Railway Services Disrupted) आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. केबल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेची सेवा पूर्ववत होणार आहे. स्थानकांवर प्रवाशी गाड्यांची वाट पाहताना दिसत आहेत.

मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरील सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या दरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द केल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे प्रमाणावर हाल (Mumbai Local News) झाले होते. सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांवरील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. या कालावधीत स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली होती.

मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक पाहायला मिळाला होता. ठाण्यामध्ये ६३ तासांचा तर सीएसएमटीमध्ये ३६ तासांचा ब्लॉक होता. यामुळे एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. प्रवाशांची धडकी भरवणारी गर्दी पाहायला मिळाली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बसच्या फेऱ्या देखील वाढविण्यात आल्या होत्या. आज देखील पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत (Mumbai News) आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडी मोर्चा

Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

SCROLL FOR NEXT