Eknath Shinde Shivsena News
Eknath Shinde Shivsena News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : आमचा उल्लेख आता शिवसेना म्हणून करा; शिंदे गटाची मीडियाला विनंती

Satish Daud-Patil

Eknath Shinde Shivsena News : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद निवडणूक आयोगाने सोडवला आहे. आयोगाने याबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आमचा उल्लेख आता शिंदे गट नाही तर शिवसेना म्हणून करा, अशी मागणी शिंदे गटाकडून माध्यमांना करण्यात आली आहे. शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी माध्यमांना हे पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे. (Political News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात फूट पडली. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. आमचीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी घेताना हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवलं.

त्यामुळे या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरू झाली. सर्वांची बाजू ऐकून झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. १७ फेब्रुवारीला सायंकाळी निवडणूक आयोगाने राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. त्यानुसार शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला.

निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अधिकृत घोषणा होऊनही अजूनही वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल माध्यमांमधून शिंदे गट असाच उल्लेख करण्यात येत आहे. याबाबत शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक पाठवले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

SCROLL FOR NEXT