Shivsena Bhavan News : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याच्या उलट सुटल चर्चा सुरू होत्या
Shivsena Bhavan News
Shivsena Bhavan NewsSaam Tv
Published On

Shivsena Bhavan News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आता शिंदे गट अधिकच आक्रमक झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या शाखा आणि पक्षकार्यालांवर ताबा घेण्यास सुरूवात केली आहे. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याच्या उलट सुटल चर्चा सुरू होत्या. (Latest Marathi News)

Shivsena Bhavan News
Bhaskar Jadhav : मतं मागायची असतील तर मोदींच्या फोटोवर मागा, बाळासाहेबांच्या नाही; भास्कर जाधव संतापले!

मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण, शिवसेना भवनावर आम्ही ताबा घेणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका. मी अधिकृत पणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, शिंदे गट दादरच्या शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याच्या उलट सुलट चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखांवर ठिकठिकाणी कब्जा केला जात आहे.

Shivsena Bhavan News
Ashok Chavan: माजी मुख्यमंत्र्यांना संपवण्याचा डाव? अशोक चव्हाण प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल

 महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची आज 'सुप्रीम' सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीची ही सुनावणी होणार असून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्ट 16 आमदारांच्या निलंबनाबाबत काय निर्णय देणार, याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे. (Political News)

याआधी मागच्या आठवड्यातही लागोपाठ तीन दिवस या मुद्द्यावर सुनावणी झाली होती, पण सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला. यानंतर आता पुन्हा एकदा मंगळवारपासून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू होईल. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीष साळवे आणि महेश जेठमलानी युक्तीवाद करतील.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com