Bhaskar Jadhav News : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा संताप व्यक्त करत शिंदे गटावर जोरदार टीका केली. मतं मागायची असतील तर मोदींच्या फोटोवर मागा. बाळासाहेबांच्या नाही, असं भास्कर जाधव म्हणाले. (Latest Marathi News)
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असताना महाराष्ट्राच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधीच स्वीकारला नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार कमी झाले, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. शिवसेनेला मत मिळाली ती हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोमुळे मिळाली नरेंद्र मोदी यांच्या फोटोमुळे नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले. (Political News)
चिचवड विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली.
आज एकनाथ शिंदे गट हा हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी च्या नावावर मत मिळाल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात 2014 ला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी युती तोडून निवडणूक लढली त्यावेळेस शिव सेनेचे 63 आमदार निवडून आले. त्यानंतर अमित शहा यांनी बळजबरीने 2019 मध्ये शिवसेनेशी युती केली त्यावेळी फक्त महाराष्ट्र शिवसेनेचे फक्त 58 आमदार निवडून आले, असा आरोपही आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
यांना मत मागायची असतील तर ते नरेंद्र फोन मोदीच्या फोटोवर मागावी बाळासाहेबांच्या फोटोवर नाही अशी सडकून टीका भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.