Eknath Shinde: शिवसेना भवनसह सर्व प्रॉपर्टीचा ताबा घेणार?; स्वत: CM एकनाथ शिंदेंनीच थेट सांगून टाकलं...

आयोगाने सांगितल्या प्रमाणे आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र ठाकरे गटाने दाखल केलेली अनेक प्रतिज्ञापत्रे बोगस निघाली, असे ते यावेळी म्हणाले..
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

Maharashtra Political Crisis: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

यानंतर शिवसेना भवन आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चा आणखीच जोर पकडू लागल्या होत्या. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे.

Eknath Shinde
Ashok Chavan: माजी मुख्यमंत्र्यांना संपवण्याचा डाव? अशोक चव्हाण प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल

काय म्हणाले एकनाथ शिंदे...

"निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्यांनी योग्यतेनुसार निर्णय घेतला आहे. आयोगाने सांगितल्या प्रमाणे आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र ठाकरे गटाने दाखल केलेली अनेक प्रतिज्ञापत्रे बोगस निघाली," असा दावा शिंदे यांनी केला आहे.

त्याचबरोबर "आम्ही शिवसेना (Shivsena) आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले.  मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही.  आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Eknath Shinde
Vardha News: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आईवरील रागापोटी घर सोडलेल्या अल्पवयीन मुलीला 10 तासात शोधलं

पुढे बोलताना, "मविआ सरकारच्या काळात बंद पडलेले अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, आम्ही केलेली कामे जनतेला दिसत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी "ब्राह्मण समाज नारज नाही विरोधी पक्ष जाणून बुजून संभ्रम निर्माण करत आहे," असे मत त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणूकीबद्दल व्यक्त केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षांचं प्रकरण ७ न्यायाधीशांकडे सोपवायचं की ५ न्यायाधीशांकडे ठेवायचं याचा निर्णय मेरिटनुसार घेतला जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत घेतला होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com