Pune Water Supply  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! निम्म्या शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका?

Water supply closed today in Pune city today: पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. आज निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Rohini Gudaghe

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुणे शहरात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं समोर आलंय. जवळपास निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज पूर्णपणे राहणार बंद आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी ससुन रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पुणे शहरातील अनेक भागात आज पाणी येणार नाही.

कोणत्या भागांना फटका?

तर उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार (Pune Water Stoarage) आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, स्वारगेट,ससून सर्वोपचार रुग्णालय,गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबाग या भागांतील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आज आणि उद्या पाण्याच्या बाबतीने काळजी घेणं गरजेचं (Pune Water) आहे.

निम्म्या शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद

निम्म्या पुणे शहराचा आज पाणी पुरवठा हा ठप्प राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असं आवाहन महानगर पालिकेनं (Pune water supply) केलंय. ससुन रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटल्याचा फटका जवळपास संपूर्ण शहराला बसणार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. यंदा पुणे शहरातील धरणसाखळी क्षेत्रात चांगला पाऊस झालाय. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ झालीय.

पाणी जपून वापरा!

खडकवासला प्रकल्पामधील चार धरणांमधील पाणीसाठा जवळपास ९० टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील यंदा पाणीकपातीचं संकट (Pune News) टळलंय. तसंच त्यांची वर्षभराची चिंता देखील मिटलीय. परंतु आता जलवाहिनी फुटल्यामुळे पुणेकरांना दोन दिवस थोडासा त्रास सहन करणार आहे. त्यांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पुणेकरांना पाणी टंचाईपासून आता दिलासा मिळालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT