बिबट्याच्या डोक्यात अडकली पाण्याची बाटली! SaamTvNews
मुंबई/पुणे

बिबट्याच्या डोक्यात अडकली पाण्याची बाटली!

बिबट्याच्या पिल्लाचा जीव धोक्यात!

अजय दुधाने

बदलापूर : बदलापूर आणि वांगणी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला होता. काही वर्षांपूर्वी मृत अवस्थेत एका बिबट्याचा (Leopard) बछडा आढळत होता. आता पुन्हा एका बिबट्याच्या पिल्ल्याचा जीव धोक्यात असल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

हे देखील पहा :

बिबट्याचा हा बछडा साधारण एक वर्षाचा असून गोरेगाव (Goregaon) परिसरात रविवारी रात्री तो पाणी पिण्यासाठी आला होता. मात्र, यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचे डोके अडकले. त्यामुळे हे कॅन घेऊन हे पिल्लू फिरत असतानाच एका पर्यटकाला दिसले. यामुळे त्याने त्याचा व्हिडीओ काढला. यानंतर या व्हिडिओच्या (Video) आधारे या पिल्लाचा रविवारी रात्रीपासून कसून शोध घेतला जात आहे.

वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, एनजीओ, प्राणीमित्र संघटना असा मोठा फौजफाटा या बिबट्याच्या पिल्लाला शोधण्यासाठी मेहनत घेत आहे. या पिल्लाच्या पायांचे ठसे आढळले असले, तरी पिल्लू मात्र आढळून आलेले नाही. रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्याने ते उपाशी आणि तहानलेले असणार आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर (Forest Department) आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT