water and air pollution increased in boisar tarapur midc near palghar saam tv
मुंबई/पुणे

Palghar : प्रदुषण मंडळाची डाेळेझाक? बोईसर-तारापूर एमआयडीसी परिसर प्रदुषणाच्या विळख्यात, 16 गावांतील नागरिकांच्या आरोग्य समस्येत वाढ

रुपेश पाटील

Palghar News :

बोईसर तारापूर एमआयडीसीमुळे (boisar tarapur midc) परिसरात वायू आणि जल प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या प्रदूषणामुळे येथील सोळाहून अधिक ग्रामपंचायत मधील नागरिक त्रस्त आहेत. या कंपन्यांमधून निघणार रासायनिक घातक केमिकल युक्त सांडपाणी खुलेआम नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडल जात असल्याने परिसरातील जलस्रोतही दूषित झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना घशाची खसखस, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग अशा आजारांची लागण हाेऊ लागली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (maharashtra pollution control board) कंपन्यांवर नियंत्रण हवे अशी भावना नागरिक व्यक्त करु लागले आहेत. (Maharashtra News)

देशातील सर्वात मोठ्या एमआयडीसींपैकी एक असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत साडेबाराशे पेक्षाही जास्त लहान मोठे कारखाने आहेत. यापैकी अनेक कारखाने हे केमिकल वर प्रक्रिया करणारे आहेत. या कारखान्यांमधून निघणार केमिकल युक्त घातक रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जात असल्याने येथील जलस्त्रोत दूषित झाले आहेत.

केमिकल युक्त रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील कुप नलिका आणि विहिरींचं पाणी दूषित झालं असून या पाण्याला केमिकलचा उग्र वास येतोय. त्यामुळे परिसरातील अनेक पाण्याचे स्त्रोत गावकऱ्यांनी बंद केले आहेत .

बोईसर तारापूर निघणार रासायनिक घातक केमिकल युक्त सांडपाणी चोरीच्या मार्गाने नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जात असतानाच दुसऱ्या बाजूला या परिसरात सध्या केमिकल माफीयांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्रीच्या सुमारास हे केमिकल माफिया कंपन्यांमधून निघणार रासायनिक सांडपाणी टँकरने परिसरात सोडत असून यावर एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातील गावांमध्ये राहायचं की नाही असा सवाल उपस्थित करून स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय .

जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे परिसरात नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असून लहान बालक ही आजार घेऊनच जन्माला येत असल्याचं येथील काही महिलांकडून सांगण्यात येतंय.

डोळ्याची जळजळ, घशाला खाज सुटणे आणि त्वचा रोग यासारखे आजार सर्रासपणे वाढत असून येथे सुरू असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपयश येत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे .

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT