Palghar : सफाळे रेल्वे फाटक 6 दिवस राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पालघर वासियांना पालघर स्टेशन ते केळवा सफाळे स्टेशन रस्त्याची कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे पालघर केळवा सफाळे वासियांना लांबचा पल्ला गाठुन प्रवास करावा लागतो.
railway gate near to saphale will be closed till 12 feb
railway gate near to saphale will be closed till 12 feb saam tv
Published On

Palghar News :

सफाळे पूर्व आणि सफाळे पश्चिमेला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळील असलेले एकमेव फाटक 12 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. हे फाटक बंद राहणार असल्याने नागरिकांनी सफाळ्याच्या कपाशी रेल्वे उड्डाणपूलावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(Maharashtra News)

सफाळे पूर्व आणि सफाळे पश्चिमेला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानक फाटका नजीक डीएफसीसीच काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. हे फाटक पुढील सहा दिवस बंद राहणार आहे.

railway gate near to saphale will be closed till 12 feb
Manoj Jarange Patil यांची प्रतिमा वाण म्हणून भेट, अनाेख्या उपक्रमाचा पाहा व्हिडिओ

हे फाटक बंद राहणार असल्याने पन्नासहून अधिक गावांमधील चाकरमानी आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. दरम्यान फाटक बंद असल्याने सफाळ्याच्या कपाशी रेल्वे उड्डाणपूलावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा अस आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल आहे.

दरम्यान पालघर वासियांना पालघर स्टेशन ते केळवा सफाळे स्टेशन असा कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे पालघर केळवा सफाळे वासियांना लांबचा पल्ला गाठुन प्रवास करावा लागतो. तरी या प्रवासाकरीता थेट रस्ता व्हावा यासाठी पालघरमधील नागरिकांनी एक्सवरुन खासदार संजय राऊत यांच्याकडे मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

railway gate near to saphale will be closed till 12 feb
Kolhapur : वस्ताद बाळ गायकवाड यांचे निधन, मल्ल हळहळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com