Manoj Jarange Patil यांची प्रतिमा वाण म्हणून भेट, अनाेख्या उपक्रमाचा पाहा व्हिडिओ

मकरसंक्रांती निमित्त वाण देण्याची प्रथा महिलांमध्ये आहे. वाण देताना काय द्यायचं असा प्रश्न अनेक महिलांना पडत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना महिला समाेर आणतात.
manoj jarange patil photo distributed as makar sankranti vaan in yavatmal
manoj jarange patil photo distributed as makar sankranti vaan in yavatmalsaam tv
Published On

- संजय राठोड

Yavatmal News :

संक्रांत निमित्त मराठा आरक्षणाचे (maratha reservation) संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या प्रतिमेचे वाण यवतमाळ जिल्ह्यात देण्यात येत आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात माेठी चर्चा हाेत असून हा अनाेखा उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे राबविण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संक्रांत निमित्त महिला वाट्या, चमचे, प्लास्टिकच्या अशा वस्तू वाण म्हणून देतात. यंदा मात्र संक्रांत निमित्त अऩाेख वाण देण्यात आल्याची घटनेची जाेरदार चर्चा सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी वादळ उठवून संपूर्ण देशात लढाऊ नेतृत्व म्हणून पुढे आलेले मनोज जरांगे पाटील आता घराघरात पोहचले आहेत. (Maharashtra News)

manoj jarange patil photo distributed as makar sankranti vaan in yavatmal
Parbhani : एसटीचे नियाेजन... भाविकांसाठी उरुसात धावणार 30 बस; जाणून घ्या तिकीट दर

यवतमाळच्या आर्णी येथील अश्वीनी देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमाच संक्रांतीचं वाण म्हणुन भेट देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. त्या म्हणाल्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची एकजूट केली. त्यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग माेकळा झाला. त्यांना पाठबळ देण्यासाठी मनाेज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेचे वाण देत आहाेत.

Edited By : Siddharth Latkar

manoj jarange patil photo distributed as makar sankranti vaan in yavatmal
Latur Bandh : सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर; आज लातुर बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com