Latur Bandh : सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर; आज लातुर बंद

या घटनेच्या निषेधार्थ यापूर्वी उदगीर शहरातील महिलांनी जन आक्रोश मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला हाेता. पाेलिसांनी याेग्य तपास करावा अशी मागणी माेर्चेकरांनी केली.
latur city bandh today hindu jan aakrosh morcha
latur city bandh today hindu jan aakrosh morchasaam tv

- संदीप भोसले

Latur News :

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) लातूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज लातूरकरांनी आक्रोश मोर्चा (hindu jan akrosh morcha latur) काढत संशियतास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. (Maharashtra News)

यापूर्वी या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी निलंगा-उदगीर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच देवणी तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.

latur city bandh today hindu jan aakrosh morcha
Parbhani : एसटीचे नियाेजन... भाविकांसाठी उरुसात धावणार 30 बस; जाणून घ्या तिकीट दर

या घटनेच्या निषेधार्थ उदगीर शहरातील महिलांनी जन आक्रोश मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देखील देण्याची मागणी केली. आता या घटनेचे पडसाद लातूर जिल्ह्यात उमटू लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंदू जन आक्रोश मोर्चा

आज लातूर जिल्ह्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी लातूर बंदची हाक देखील देण्यात आली. माणुसकीला काळिंमा फासणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे.

माेठा पाेलिस बंदाेबस्त

आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत लातूर शहर व परिसर दणाणून साेडला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

latur city bandh today hindu jan aakrosh morcha
Congress चे फेब्रुवारीत लाेणावळामध्ये चिंतन शिबीर, राहूल गांधी करणार मार्गदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com