mumbai rain 2022
mumbai rain 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain : मुंबईत पुढील ३-४ तास मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जून महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने (Rain) जुलै महिन्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याबाबत हवामान खात्याने आधीच रेड अलर्ट जारी केला होता. आता महाराष्ट्र येत्या ३-४ तासांत मुंबई (Mumbai), पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता असलाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाने (IMD Mumbai) दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. सोबतच अधूनमधून 40-50 किमी/ताशी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. (Mumbai Rain Live Updates)

हे देखील पाहा -

पुढील चार दिवस राज्यभरात हिच स्थिती कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्‍यावरील पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित होत आहे. परिणामी 4-5 दिवसात मुंबई, ठाण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाऊस होणार असून मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही पावसासाठी ही अनुकूल स्थिती होती. मात्र राज्यातील काहीच भागात पाऊस झाला. उर्वरित भागात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नाही. या आठवड्यात मात्र राज्यातील पावसाची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (Rain News Maharashtra)

दुसरीकडे पालघरमध्ये गुरुवारपर्यंत 'रेड अलर्ट' तर मुंबई-ठाण्यामध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरीलाही मंगळवारसाठी 'रेड अलर्ट' असून नाशिक, पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये मंगळवारी रेड अलर्ट असून इतर दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात गडचिरोली येथे मंगळवारी रेड अलर्ट आहे. चंद्रपूर येथे मंगळवारी ऑरेंज अलर्ट आहे तर नागपूर, अकोला, अमरावती येथे बुधवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT