Maharashtra Rain : गोदावरी नदीला पूर; कोपरगावचा लहान पुल वाहतुकीसाठी बंद

प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागर‍िकांना अत‍िदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Kopargaon Monsoon Update, Maharashtra Rain Update, Godavari River Nashik Today News, Nashik Rain News
Kopargaon Monsoon Update, Maharashtra Rain Update, Godavari River Nashik Today News, Nashik Rain NewsSaam Tv

मोबीन खान, साम टीव्ही

अहमदनगर/कोपरगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. अशातच अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा व‍िसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागर‍िकांना अत‍िदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. (Kopargaon Latest News)

Kopargaon Monsoon Update, Maharashtra Rain Update, Godavari River Nashik Today News, Nashik Rain News
Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या नागर‍िकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात असून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कायम असल्यानं नाशिकमध्ये गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे. गोदा घाटावर जाणारे रस्तेही कालपासून पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. नाशिक शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांमधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. (Godavari River Nashik Today News)

Kopargaon Monsoon Update, Maharashtra Rain Update, Godavari River Nashik Today News, Nashik Rain News
Weather Updates : नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; पहिले ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

जायकवाडीचा पाणीसाठा 37 टक्क्यांवर

नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल अडीच टक्क्यांनी पाणी वाढलंय. काल जायकवाडी धरणात 35 टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र त्यात आज वाढ होऊन धरणाचा पाणीसाठा 37.11 टक्क्यावर पोहोचलाय.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सध्या 17 हजार 115 क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. (Nashik Rain News)

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com