Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे
Weather Updates
Weather Updates Saam Tv
Published On

मुंबई : जून महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने (Rain) जुलै महिन्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना देखील घडल्या असून प्राण्यांचा मृत्युही झाला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain News)

Weather Updates
Weather Updates : नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; पहिले ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

पुढील चार दिवस राज्यभरात हिच स्थिती कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्‍यावरील पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित होत आहे.

परिणामी 4-5 दिवसात मुंबई, ठाण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाऊस होणार असून मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही पावसासाठी ही अनुकूल स्थिती होती. मात्र राज्यातील काहीच भागात पाऊस झाला. उर्वरित भागात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नाही. या आठवड्यात मात्र राज्यातील पावसाची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (Rain News Maharashtra)

दुसरीकडे पालघरमध्ये गुरुवारपर्यंत 'रेड अलर्ट' तर मुंबई-ठाण्यामध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरीलाही मंगळवारसाठी 'रेड अलर्ट' असून नाशिक, पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये मंगळवारी रेड अलर्ट असून इतर दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात गडचिरोली येथे मंगळवारी रेड अलर्ट आहे. चंद्रपूर येथे मंगळवारी ऑरेंज अलर्ट आहे तर नागपूर, अकोला, अमरावती येथे बुधवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com