Walmik Karad News SaamTv
मुंबई/पुणे

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला मकोका, १४ दिवसांची कोठडी; कोर्टात काय काय झालं?

walmik karad Latest News : वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला, वाचा सविस्तर

विनोद जिरे

Walmik Karad Case : संतोष देशमुख खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. आता यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीकडून ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आज वाल्मिक कराडला कोर्टात आणलं गेलं. या प्रकरणात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद झाला. सरकारी वकिलाने म्हटलं की, 'आम्हाला वाल्मिक कराडच्या हत्येत सहभाग तपासायचा आहे. त्यामुळे त्याची १० दिवसांची सीआयडी कोठडी द्या. वाल्मिक कराड याचे तपास अधिकाऱ्यांनी व्हाईस सॅम्पल घेतले आहेत. देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का? याचा तपास करायचा आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा आहे, त्यामुळे दहा दिवसांची कोठडी द्या. हत्यात सहभाग आहे का नाही? याचाही तपास करायचा आहे.

आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, 'सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दया. सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का? पंधरा दिवसात यांनी काय तपासले. घुले ,कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही? कराड तपासाला सहकार्य करत आहेत, मग आणखी पोलीस कोठडी कशासाठी? आता आणखी कोणता तपास करायचा राहिला आहे. असा सवाल कराडच्या वकिलांकडून कोर्टात सवाल उपस्थित करण्यात आला.

'बँक खात्याचे चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान आहे. आरोपीच्या चौकशीची गरज नाही. याआधी वाल्मीक कराड याची 14 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. आता आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

'पंधरा दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी आहे. सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. व्हॉइस सॅम्पल घेतले आहेत. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्या, असे आरोपीच्या वकिलांनी म्हटलं. तर इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का? याचा देखील तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT