Wadala Firing Case: साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Wadala firing case latest news : मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ एका व्यक्तीवर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेत व्यक्ती सुखरूप बचावली असून पोलिसांनी एका तासात दोन आरोपींना अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे/साक्षी यादव, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Wadala Firing Case: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात काल रात्री खळबळजनक घटना घडली. आर. ए. किदवाई रोडवर, एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ असलेल्या चार रस्ता परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात संबंधित व्यक्ती थोडक्यात बचावली असून, त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या एका तासात दोघांना अटक केली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळ्यातील चार रस्ता परिसरातून एक व्यक्ती रस्त्यावरून जात होती. यादरम्यान ओला कारमधून आलेल्या तीन जणांनी अचानक त्या व्यक्तीवर टार्गेट करून तीन राऊंड फायरिंग केले. मात्र, प्रसंगावधान राखून पीडित व्यक्तीने तिथून पळ काढल्याने तिचा जीव वाचला. गोळीबाराच्या या थरारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांची धडाकेबाज कारवाई

घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलीस, क्राईम ब्रँच युनिट ४ आणि परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त (DCP) अनुराग जैन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.

तसेच पोलिसांनी तातडीने चक्रे हलवत अवघ्या एका तासात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कारवाई परिमंडळ ४ चे डीसीपी अनुराग जैन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एंटॉप हिल पोलीस ठाण्याच्या एटीसी अधिकारी केदार उमटे व गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी गौरव शिंदे यांनी केली.

दोन पिस्तूल आणि काडतूस जप्त

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून दोन पिस्तूल (ज्यात एक देशी कट्टा समाविष्ट आहे) आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माटुंगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी आणि पीडित व्यक्ती हे सर्वजण उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे हल्लेखोर नेमके कोणत्या कारणासाठी मुंबईत आले होते आणि त्यांच्यात नेमका काय वाद होता, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. तिसऱ्या आरोपीचा शोध घेणे आणि गोळीबारामागील खरे कारण समोर आणण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT