vistara aircraft plan engine hit by tow truck Mumbai airport shocking incident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Airport News: उड्डाण भरणाऱ्या विमानाला ट्रकची धडक; मुंबई विमानतळावरील थरारक घटना

Satish Daud

Mumbai Airport News: मुंबई विमानतळावरून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. धावपट्टीवरून उड्डाण भरणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाला एका टो-ट्रकने धडक दिली. या विमानातून 140 प्रवाशी प्रवास करीत होते. ट्रकची धडक बसताच पालटने सतर्कता दाखवत वेळीच विमानाचं उड्डाण रोखलं. यामुळे पुढील अनर्थ टळला.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विमानाच्या इंजिनचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एएनआयच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान मुंबईहून कोलकात्ताला जाणार होतं.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून 140 प्रवाशांना घेऊन विमान उड्डाण करणार होते. यावेळी एका टो ट्रकने विमानाला धडक दिली. ट्रक विमानाला धडकल्याने इंजिनला आग लागण्याचा धोका होता.

मात्र, पायलटने सतर्कता दाखवल्याने पुढील दुर्घटना टळली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. हा अपघात झाला तेव्हा विमानात 140 प्रवासी होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, विमानातील प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आलं.

घटनेबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई-कोलकाता टेक-ऑफ फ्लाइटला विमानतळावरील ग्राउंड सर्व्हिस उपकरणाची (टो ट्रक) धडक बसल्याने एका इंजिनचे नुकसान झाले. विमानाची आवश्यक तपासणी आणि दुरुस्ती केली जात आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT