MUMBAI LOCAL TRAIN UPDATE: 15 COACH VIRAR DAHANU TRAIN STARTS TO REDUCE CROWD Saam Tv
मुंबई/पुणे

Western Railway News : विरार-डहाणूकरांसाठी मोठी बातमी, १५ डब्यांची लोकल धावली, तिकीट किती? कोणते थांबे असणार?

Mumbai Western Railway Update : विरार ते डहाणू मार्गावर आज पासून पहिली १५ डब्यांची लोकल सेवा सुरू झाली असून प्रवासी क्षमतेत २५% वाढ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.

Alisha Khedekar

  • विरार-डहाणू मार्गावर १५ डब्यांची लोकल सुरू

  • प्रवासी क्षमतेत २०-२५% वाढ अपेक्षित

  • गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेचा निर्णय

  • एसी लोकल सेवांमध्येही वाढ करण्यात येणार

Mumbai Virar Dahanu Palghar New Local Train मुंबई उपनगरातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गर्दीची कटकट संपली कारण, प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने आजपासून विरार ते डहाणू दरम्यान पहिली १५ डब्यांची लोकल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी सकाळी 5.35 मिनिटांनी ही लोकल धावली. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे विशेषतः या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीएफ (ICF) कंपनीने तयार केलेल्या दोन नवीन १५ डब्यांच्या लोकल ट्रेन प्रथमच विरार कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. यापैकी एक ट्रेन विरार-डहाणू मार्गावर धावणार आहे. सध्या या मार्गावर चालणाऱ्या १२ डब्यांच्या १७ नॉन-एसी लोकल सेवांचे टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या सेवांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या बदलामुळे गाडीची प्रवासी क्षमता वाढणार आहे. यामुळे १५ डब्यांच्या सेवांची एकूण संख्या २२७ वरून २४४ पर्यंत वाढेल. यापैकी ८ सेवा प्रथमच विरार-डहाणू रोड या मार्गावर सुरू करण्यात येणार आहेत, ज्यामुळे या विभागातील प्रवाशांना अधिक जागा आणि सोयीचा प्रवास अनुभवता येईल. तथापि, काही कारणांमुळे या १५ डब्यांच्या गाड्या ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स या स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच, दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर या गाड्या दुहेरी थांबा घेणार आहेत.

याशिवाय, पश्चिम रेल्वेने १२ अतिरिक्त एसी लोकल सेवा सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे आठवड्याच्या दिवसांत एसी सेवांची संख्या १३३ वरून १४५ होईल, तर शनिवार-रविवारी ती १०६ वरून ११८ पर्यंत वाढेल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विरार-डहाणू परिसरात जलद गतीने शहरीकरण आणि औद्योगिक विकास होत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असून गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १५ डब्यांच्या लोकल सेवेमुळे प्रवासी क्षमतेत सुमारे २० ते २५ टक्के वाढ होणार असून, यामुळे गर्दी कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुलभ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT