कलिंगडाबाबत सोशल मीडियावर अपप्रचार
बोरीबेल येथील अनुभवी शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांनी केला मोठा दावा
मुंबईत घडलेल्या घटनेनंतर चर्चांना उधाण
मुंबईत कलिंगडाचे सेवन केल्यानंतर ४ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ऐन उन्हाळ्यात कलिंगडाच्या सेवनाने झालेल्या मृत्यूने सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहे. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यू झाल्याने कलिंगड खाल्ल्यामुळे झाल्याचा दावा सोशल मीडियावर होत आहे.परंतु सोशल मीडियावरील दावा निराधार असल्याचा दावा पुण्याच्या दौंड तालुक्यातील शेतकरी बोरीबेल येथील अनुभवी शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांनी केलाय.
बाळकृष्ण पाचपुते यांनी गेली २० ते २५ वर्षे कलिंगड शेती करतात. त्यांनी कलिंगडचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं आहे. 'कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाल्याचे आतापर्यंत आजवर कधीही घडलेले नाही. यामागे काहीतरी वेगळं कारण असण्याची शक्यता आहे, असं पाचपुतेंनी ठामपणे सांगितलं.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ होत आहे. कलिंगड लाल दिसण्यासाठी किंवा विक्रीसाठी इंजेक्शन दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे, असा दावा व्हायरल व्हिडिओतून करण्यात येत आहे. घटनेशी संबंधित अनेक पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. परंतु व्हायरल व्हिडिओ आणि पोस्टमधील दावा खोडून काढला आहे. त्यांनी पोस्टमधील माहिती चुकीची असल्याचं सांगितलं आहे. कलिंगडला इंजेक्शन देणे व्यवहार्य नसून शेतकरी असे कृत्य करत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
'शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तो ४२ अंश तापमानातही शेती करतो. शेतात कष्ट करून पिके उगवतो. शेतकऱ्यांवर आरोप करणे अन्यायकारक आहे. कलिंगड हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणारे फळ आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विश्वासार्ह माहितीवरच भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
कलिंगडाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेला अपप्रचार थांबवण्याची विनंतीही त्यांनी केली. नागरिकांनी शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवावा, अशी विनंती त्यांनी प्रशासन आणि नागरिकांना केलीये. तत्पूर्वी, कलिंगडच्या सेवनानंतर मृत्यू झालेल्या ४ जणांचे वैद्यकीय अहवाल आलेला नाही. या अहवालानंतरच त्या चौघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.