ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही
पुणे : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या गाडील रविवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात मेटेंचा जागीचा मृत्यू झाला. मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, ज्योती मेटे यांच्यानंतर आता त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Vinayak Mete News)
मेटे यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नेमका कुणाच्या संपर्कात होता याची चौकशी व्हावी अशी मागणीही नातेवाईकांनी केलीये. या दुःखातून आम्ही सावरलो नाही मात्र ३ दिवसानंतर आम्ही माध्यामांसमोर यायचं ठरवलं, असं विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटलं आहे. हा घातपात का अपघात हे निष्पन्न झाले नाही. ड्रायव्हर जो आहे तो वेग वेगळे स्टेटमेंट देतो आहे. असंही बाळासाहेब यांनी म्हटलं.
'विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर मला फोन आले. साहेबांचे ३ ड्रायव्हर आहेत मला माहित नव्हतं त्यावेळी साहेबांसोबत कोण ड्रायव्हर आहेत ते... त्यानंतर एकनाथ कदम हा ड्रायव्हर आहे असे कळले तर मी त्याला मी फोन केला. मी त्याला त्यांचा लोकेशन विचारले. रोज फिरणारा ड्रायव्हर मला विचारात होता की तुम्ही कोण बोलतंय म्हणून... मी त्याला लोकेशन सांग असे सातत्याने विचारत होतो पण तो नुसता रडत होता'. (Vinayak Mete Todays News)
'तिथे असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीला त्याने फोन दिला. आणि त्याने मला सांगितलं की तिथे अँब्युलन्स आली आहे. ड्रायव्हरला काही झाले नाही पोलिस जखमी आहेत पण साहेब जागेवर गेले आहेत. साहेबांच्या पायाला, डोक्याला लागलं आहे. असे ड्रायव्हरने मला सांगितलं. हा ड्रायव्हर रोज सातत्याने स्टेटमेंट बदलत चालला आहे'.
'सरकारने समिती नेमली पण त्याचा पुढे काहीच झालं नाही. हा घात आहे का अपघात हे आम्हाला कळायला हवे. आम्ही या दुःखातून सावरलो नाही सर्व चुकी ड्रायव्हर एकनाथ कदम यांची आहे. सीसीटीव्हीमध्ये आम्हाला पाठलाग करणारी गाडी कुठेच दिसली नाहीत. हा ड्रायव्हर सतत कोणाला फोन करत होता. ड्रायव्हरचा संपर्क कोणाशी होता, त्याचे कॉल डिटेल्स हवेत'. अशी मागणीही मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.